शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
4
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
5
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
6
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
7
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
8
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
9
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
11
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
12
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
13
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
14
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
15
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
16
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
17
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
18
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
19
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
20
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

Malaysian Open Badminton: दडपणासमोर पुन्हा हरली सिंधू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2018 20:12 IST

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूला मलेशिया ओपन वर्ल्ड टूर सूपर ७५0 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कडव्या संघर्षानंतर पराभव पत्करावा लागला. पुरूष एकेरीत श्रीकांत किदम्बीलाही पराभव पत्करावा लागल्याने भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

ठळक मुद्देसंघर्षानंतरही सिंधूच्या पदरी अपयश

क्वालालंपूर - ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूला मलेशिया ओपन वर्ल्ड टूर सूपर ७५0 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कडव्या संघर्षानंतर पराभव पत्करावा लागला.  पुन्हा एकदा दडपणामुऴे सिंधूला हार पत्करावी लागली. महत्वाच्या लढतीत सामना तिस-या गेमपर्यंत गेल्यास सिंधू प्रचंड ताण घेते आणि त्याचा तिच्या खेऴावर परिणाम होतो. याचीच प्रचिती मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आली. तिच्यासह पुरूष एकेरीत श्रीकांत किदम्बीलाही पराभव पत्करावा लागल्याने भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.चायनिज तैपेईच्या ताय झु यिंगविरूद्घ सिंधूला नेहमी झगडावे लागते. जय-पराजयाच्या आकडेवारीत यिंग 9-3 अशी आघाडीवर आहे आणि सामना तिस-या गेममध्ये गेल्यावर सिंधू निष्प्रभ होते, ही चाल यिंग ओऴखून आहे. तिस-या गेममध्ये यिंगने हीच संधी हेरून विजय निश्चित केला. सिंधूने 0-1 अशा पिछाडीवरून मुसंडी मारली, परंतु तिला तो संघर्ष कायम राखण्यात अपयश आले. यिंगने 21-15, 19-21, 21-11 असा विजय मिऴवत अंतिम फेरीत प्रवेश केला.

पुरूष एकेरीत एकमेव आशास्तान असलेल्या श्रीकांतलाही उपांत्य फेरीचा अडथऴा पार करता आला नाही. जपानच्या केंटो मोमोटाने 21-13, 21-13 अशी सहज बाजी मारली. 

टॅग्स :BadmintonBadmintonPV Sindhuपी. व्ही. सिंधूKidambi Srikanthकिदम्बी श्रीकांतSportsक्रीडा