नवी दिल्ली : बॅडमिंटन स्टार किदाम्बी श्रीकांत याने एका क्रमांकाने प्रगती केली असून, तो आज जाहीर झालेल्या बीडब्ल्यूएफ रँकिंगमध्ये चौथ्या स्थानी पोहोचला आहे. त्याचप्रमाणे उदयोन्मुख भारतीय शटलर लक्ष्य सेन याने १९ क्रमांकांनी झेप घेतली असून, तो विश्व रँकिंगमध्ये अव्वल १०० मध्ये पोहोचला आहे.१६ वर्षीय लक्ष्य याला या हंगामात आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनस्पर्धेत चांगल्या केलेल्या कामगिरीचा फायदा मिळाला. या युवा स्टार खेळाडूने युरेशिया बुल्गारियाओपन आणि इंडिया इंटरनॅशनल सिरीजमध्ये विजेतेपद पटकावले. तसेच गत आठवड्यात टाटाओपन इंडिया इंटरनॅशनल चॅलेंजमध्ये तो उपविजेता राहिला होता. तो रँकिंगमध्ये ८९ व्या स्थानावर पोहोचला आहे.श्रीकांतने दुखापतीमुळे चायना ओपन आणि हाँगकाँग ओपनमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला होता. तो पुढील आठवड्यात सुरू होणाºया दुबई ओपन सुपर सिरीज फायनलमध्ये खेळताना दिसणार आहे.अन्य खेळाडूंत एच. एस. प्रणय आणि बी. साई प्रणीत हे अनुक्रमे १० व्या आणि १७ व्या स्थानावर कायम आहेत. महिलांच्या एकेरीत पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल अनुक्रमे तिसºया व १० व्या स्थानावर कायम आहेत, तर रितुपर्णा दासने तीन क्रमांकांनी झेप घेतली असून, ती ४९ व्या स्थानावर पोहोचली आहे.प्रणव जेरी चोपडा आणि एन. सिक्की रेड्डी हे मिश्र दुहेरीत १९ व्या स्थानावर आहेत. (वृत्तसंस्था)
किदाम्बी श्रीकांत चौथ्या स्थानावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 02:32 IST