शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सायना नेहवाल पराभूत; अंतिम फेरीचं स्वप्न भंगलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2017 22:06 IST

ग्लास्गोमध्ये झालेल्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिपमच्या उपांत्य फेरीत भारताची फुलराणी सायना नेहवालला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे

ठळक मुद्देग्लास्गोमध्ये झालेल्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिपमच्या उपांत्य फेरीत भारताची फुलराणी सायना नेहवालला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे जपानच्या नोजोमी ओकुहाराविरुद्ध झालेल्या या स्पर्धेमध्ये सायना नेहवालला पराभवाला सामोर जावं लागलं.

ग्लास्गो, दि. 26-  ग्लास्गोमध्ये झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेमधील उपांत्य फेरीत भारताची फुलराणी सायना नेहवालला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. जपानच्या नोजोमी ओकुहाराविरुद्ध झालेल्या या स्पर्धेमध्ये सायना नेहवालला पराभवाला सामोर जावं लागलं. त्यामुळे आता सायनाला कास्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे. नोजोमीने 12-21, 21-17, 21-10 अशा सरळ सेटमध्ये सायनाचा पराभव केला. त्यामुळे जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सायना विरूद्ध सिंधू असा सामना पाहण्याचं भारतीयांचं स्वप्न भंगलं आहे. उपांत्यपूर्व फेरीत ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूला पराभवाचा धक्का देणाऱ्या ओकुहाराने दुसऱ्या आणि तिसऱ्या गेममध्ये जबरदस्त खेळ केला. पहिला गेम अगदी आरामात जिंकणाऱ्या सायनाचा त्यानंतर ओकुहारासमोर निभाव लागला नाही. 

पहिला गेममध्ये चांगला खेळ करणारी सायना दुसऱ्या गेममध्ये पिछाडीवर होती. १० सुपर सीरिज विजेत्या सायनाला ४ सुपर सीरिज विजेत्या ओकुहाराने कडवी झुंज दिली. सुरुवातीला ४-१ अशा पिछाडीवर पडलेल्या सायनाने त्यानंतर १०-१० आणि १५-१५ अशी बरोबरी साधली. मात्र त्यानंतर ओकुहाराने फॉर्म बदलत दुसरा गेम २७ मिनिटांमध्ये जिंकत सामना बरोबरीत आणला.

तिसऱ्या गेममध्ये सायनाची कसोटी लागली होती. जागतिक क्रमवारीत १२ व्या क्रमांकावर असलेली ओकुहारा या गेममध्ये सरस ठरली. थकव्यामुळे सायनाला फारसा प्रतिकार करता आला नाही. हा गेम ओकुहाराने २१-१० असा सहज जिंकला. त्यामुळे सायनाचं आव्हान संपुष्टात आलं. आता दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्याकडे सगळ्यांचा लक्ष लागलं आहे. या सामन्यात पी. व्ही. सिंधूचा सामना चीनच्या चेन युफेईशी होणार आहे.

उपांत्यपूर्व फेरीत सायनाने स्कॉटलँडच्या क्रिस्टी गिलमौरचा केला पराभवसायना नेहवाल हिने विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये स्कॉटलँडच्या क्रिस्टी गिलमौरचा पराभव करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. याआधी रिओ ऑलिम्पिकची पदक विजेती स्टार पी. व्ही. सिंधू हिने सुद्धा उपांत्य फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीत सायना नेहवाल हिचा स्कॉटलँडच्या क्रिस्टी गिलमौर विरुद्ध सामना झाला. यामध्ये सायना नेहवालने क्रिस्टी गिलमौर हिचा 21-19, 18-21, 21-15 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. आता उपांत्य फेरीत सायना नेहवाल आणि नोजोमि ओकुहारा यांच्यात लढत  झाली. त्याआधी रिओ ऑलिम्पिकची पदक विजेती सिंधूने विश्व क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेली चीनची सून यू हिच्यावर सरळ सेटमध्ये विजय नोंदवित किमान कांस्य पदक निश्चित केलं. 2013 आणि 2014 मध्ये कांस्य जिंकणा-या 22 वर्षांच्या सिंधूने शुक्रवारी 39 मिनिटांत 21-14, 21-9 अशा फरकाने विजय साजरा केला. विश्व क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या सिंधूची उपांत्य फेरीत दहाव्या स्थानावर असलेली चीनची चेन युफेईविरुद्ध गाठ पडणार आहे. युफेईने थायलंडची माजी चॅम्पियन रतनचोक इंतानोन हिच्यावर विजय नोंदविला