शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन : सिंधू, सायना, श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 03:01 IST

भारताची पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल आणि किदाम्बी श्रीकांत यांनी गुरुवारी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

जकार्ता : भारताची पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल आणि किदाम्बी श्रीकांत यांनी गुरुवारी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.दुसऱ्या मानांकित सिंधूने स्थानिक खेळाडू ग्रेगोरिया मारिस्का टीचा ३७ मिनिटांमध्ये २३-२१, २१-७ ने पराभव केला, तर किदाम्बी श्रीकांतनेही अंतिम आठमध्ये स्थान निश्चित केले. सिंधूने गेल्यावर्षी राष्ट्रकुल स्पर्धा, विश्व चॅम्पियनशिप आणि आशियन गेम्समध्ये रौप्यपदक पटकावण्याव्यतिरिक्त गेल्यावर्षी विश्व टूर फायनलमध्ये जेतेपद पटकावले. पुढच्या फेरीत सिंधूला स्पेनच्या कॅरोलिना मारिनच्या आव्हानाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.लंडन आॅलिम्पिकच्या कांस्यपदक विजेत्या सायनाने इंडोनेशियाच्या फिररियानीचा २१-१७, २१-१५ ने पराभव करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. सायनाचा फितरियानीविरुद्ध हा पाचवा विजय आहे. आठवे मानांकन प्राप्त श्रीकांतने आशियन गेम्सचा कांस्यपदक विजेता केंटा निशिमोतोचा २१-१४, २१-९ ने पराभव केला. गेल्या आठवड्यात मलेशिया मास्टर्सच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारणाºया श्रीकांतला आता इंडोनेशियाचा आशियन गेम्स चॅम्पियन जोनाथन क्रिस्टी किंवा चीनचा आॅल इंग्लंड चॅम्पियन शि युकी यांच्यापैकी एकाच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.मनू अत्री व बी. सुमित रेड्डी या पुरुष दुहेरीच्या जोडीला किम अस्ट्रूप व एंडर्स स्कारूप रासमुसेन या पाचव्या मानांकित जोडीविरुद्ध १४-२१, २१-१७, १०-२१ ने पराभव स्वीकारावा लागला. पहिल्या लढतीत माजी आॅलिम्पिक चॅम्पियन ली शुरुईचा पराभव करणाºया सिंधूने आपल्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध ५-० ची कामगिरी कायम राखली. (वृत्तसंस्था)