शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

माझा व्हिसा लवकर द्या, गोल्ड मेडलिस्ट बॅडमिंटनपटूची सुषमा स्वराजकडे मागणी

By namdeo.kumbhar | Updated: August 17, 2017 12:09 IST

नवी दिल्ली, दि. 15 - स्कॉटलंडच्या ग्लासगो शहरात रंगणाऱ्या आगामी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतीय संघ 17 तारखेला रवाना होत आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिला दुहेरीतील एन.सिकी रेड्डीचा व्हिसा अद्याप आलेला नाही. 21 ते 27 ऑगस्ट दरम्यान रंगणाऱ्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत तिची जोडी आश्विनी पुनप्पासोबत आहे. आश्विनी पुनप्पाचा ...

ठळक मुद्दे21 ते 27 ऑगस्ट दरम्यान स्कॉटलंडच्या ग्लासगो शहरात रंगणार आगामी जागतिक बॅडमिंटन स्पर्धा17 तारखेला भारतीय संघ स्कॉटलंडसाठी रवाना होत आहेपी.व्ही.सिंधू , सायना नेहवाल आणि श्रीकांत किदम्बी यांच्यावर या स्पर्धेत मोठी जबाबदारी

नवी दिल्ली, दि. 15 - स्कॉटलंडच्या ग्लासगो शहरात रंगणाऱ्या आगामी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतीय संघ 17 तारखेला रवाना होत आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिला दुहेरीतील एन.सिकी रेड्डीचा व्हिसा अद्याप आलेला नाही. 21 ते 27 ऑगस्ट दरम्यान रंगणाऱ्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत तिची जोडी आश्विनी पुनप्पासोबत आहे. आश्विनी पुनप्पाचा व्हिसा कालच आला पण तिचा अद्याप आला नाही, त्यामुळे सिकी रेड्डी चिंतेत आहे. मदतीसाठी सिकी रेड्डीने परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराजकडे मदतीची धाव घेतली आहे.सिकी रेड्डीनं ट्विट करत व्हिसा मिळण्याबद्दल सुषमा स्वराज, विजय गोयल यांना विनंती केली आहे. सध्या जागतिक बॅडमिंटन मानांकनात सिकी रेड्डी 20 व्या स्थानावर आहे. आपल्या बॅडमिंटन करियरमध्ये तिनं आतापर्यंत 13 व्या स्थानापर्यंत मजल मारली आहे. साऊथ एशियन गेम्समध्ये सिकी रेड्डीनं भारताचं प्रतिनिधित्व करताना गोल्ड मेडल पटकावलं आहे. तसेच 2016 मध्ये ब्राझील रशियामध्ये झालेल्या स्पर्धेतही तिनं गोल्ड मेडल पटकावलं आहे. आश्विनी पुनप्पा आणि सिकी रेड्डीने व्हिसासाठी एकाच दिवशी अर्ज दाखल केला होता. 17 तारखेला भारतीय संघ स्कॉटलंडसाठी रवाना होत आहे. सिकी रेड्डीचा व्हिसा अद्याप न आल्यामुळे भारतीय संघासोबत ती जाऊ शकणार नाही. भारतीय बॅडमिंटन असोसिएशनच्या मते सिकी रेड्डीनं व्हिसासाठी उशीरा अर्ज दाखल केला होता. तिला व्हिसा लवकरच मिळेल.

9 ऑगस्ट रोजी आगामी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारताच्या संघाची घोषणा करण्यात आली. ऑगस्ट 21 ते 27 दरम्यान स्कॉटलंडच्या ग्लासगो शहरात ही स्पर्धा रंगणार आहे. रिओ ऑलिम्पीकमधील रौप्यपदक विजेती पी.व्ही.सिंधू , सायना नेहवाल आणि जागतिक क्रमवारीत 8 व्या क्रमांकावर असलेल्या श्रीकांत किदम्बी यांच्यावर या स्पर्धेत मोठी जबाबदारी असणार आहे. श्रीकांत व्यतिरीक्त अजय जयराम, बी. साई प्रणीत यांनाही संघात स्थान मिळालं आहे. याव्यतिरीक्त राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद मिळवणारे रितुपर्ण दास आणि तन्वी लाड यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

या स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघावर एक नजर  पुरुष एकेरी - श्रीकांत किदम्बी, अजय जयराम, बी.साई प्रणीत, समीर वर्मामहिला एकेरी -  पी.व्ही.सिंधू, सायना नेहवाल, रितुपर्ण दास, तन्वी लाडपुरुष दुहेरी - मनु अत्री आणि सुमित रेड्डी, सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी, श्लोक रामचंद्रन आणि एम.आर.अर्जुनमहिला दुहेरी - आश्विनी पुनप्पा आणि एन.सिकी रेड्डी, संजना संतोष आणि आर्थी सारा सुनील, मेघना जक्कमपुडी आणि पुर्विशा एस.राममिश्र दुहेरी- प्रणव चोप्रा आणि एन.सिकी रेड्डी, बी. सुमित रेड्डी आणि आश्विनी पुनप्पा, सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि के. मनिषा

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराज