शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आजारी असूनही पी.व्ही. सिंधूने दुबई बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिली कडवी लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 12:26 IST

दुबई ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमध्ये पी.व्ही.सिंधूचा पराभव झाला असला तरी सिंधू तब्येत बरी नसताना अंतिम फेरीचा सामना खेळत होती.  

ठळक मुद्देदुबई ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत जपानच्या अकाने यामागुचीनं सिंधूचा तीन गेममध्ये 1-2 अशा फरकानं पराभव केला.  गोपीचंद यांनी प्रशिक्षणातील आव्हाने आणि सिंधूची 2018 बॅडमिंटन मोसमासाठी कशी तयारी आहे त्याची माहिती दिली.  

नवी दिल्ली - दुबई ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमध्ये पी.व्ही.सिंधूचा पराभव झाला असला तरी सिंधू तब्येत बरी नसताना अंतिम फेरीचा सामना खेळत होती.  या संपूर्ण स्पर्धेदरम्यान सिंधू आजारी होती. ती सर्दीने हैराण झाली होती. पण तरीही तिने अंतिम फेरीत उत्तम लढत दिली असे सिंधूचे प्रशिक्षक पुललेला गोपीचंद यांनी सांगितले.  टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना गोपीचंद यांनी प्रशिक्षणातील आव्हाने आणि सिंधूची 2018 बॅडमिंटन मोसमासाठी कशी तयारी आहे त्याची माहिती दिली.  

दुबई ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत जपानच्या अकाने यामागुचीनं सिंधूचा तीन गेममध्ये 1-2 अशा फरकानं पराभव केला.  अकाने यामागुचीनं जागतिक क्रमवारीत दुस-या स्थानावर आहे. पहिला सेट जिंकल्यानंतर  दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये यामागुचीच्या आक्रमक खेळीपुढे सिंधूचा पराभव झाला. यामागुचीनं 21-15, 12-21, 21-19 असा सिंधूचा पराभव करत चषकावर नाव कोरलं. 

जिंकण्यासाठी तुम्हाला शेवटचा पराभव विसरुन वेगाने पुढे जावं लागतं असे गोपीचंद म्हणाले.  प्रशिक्षक म्हणून काम करताना खेळाडू त्याच्या पराभवावर जास्त विचार करणार नाही याकडे तुमचे लक्ष असले पाहिजे. खेळाडूला पुढच्या लढतीसाठी मानसिक दृष्टया तयार ठेवण्याची जबाबदारी आव्हानात्मक असते. पराभवातून पुन्हा उभे राहण्यासाठी खेळाडूला मदत करण्याची प्रशिक्षक म्हणून माझी जबाबदारी आहे असे गोपीचंद म्हणाले. 

बॅडमिंटन वेळापत्रक व्यस्त; पण पर्याय नाहीभारतीय खेळाडू व्यस्त वेळापत्रकाचा सातत्याने सामना करीत असल्याची कबुली देत राष्ट्रीय कोच पुलेला गोपीचंद यांनी व्यस्त वेळापत्रकाशी ताळमेळ साधण्याशिवाय खेळाडूंपुढे पर्याय नसल्याचे म्हटले आहे.   भारतीय खेळाडू गरजेपेक्षा अधिक स्पर्धा खेळत असल्याचे विधान दिग्गज खेळाडू प्रकाश पदुकोण यांनी नुकतेच केले. त्यांच्या वक्तव्यानंतर देशात बॅडमिंटनपटूंच्या व्यस्त वेळापत्रकाचीच चर्चा सुरू झाली. एका कार्यक्रमात बोलताना गोपीचंद म्हणाले,‘व्यस्त वेळापत्रकाचा फटका केवळ भारतीय खेळाडूंनाच नव्हे तर जगातील खेळाडूंना बसतो आहे. महत्त्वपूर्ण असलेल्या आशियाई आणि राष्ट्रकुलसारख्या स्पर्धांमध्ये खेळणे गरजेचे असल्यामुळे भारतीय खेळाडूंसाठी पाठोपाठ स्पर्धा खेळणे ही मोठी डोकेदुखी ठरत आहे.’

युरोपातील खेळाडू राष्ट्रकुल किंवा आशियाई खेळात खेळत नाहीत पण आमच्या खेळाडूंपुढे पर्याय नाही. आमच्या खेळाडूंना परिस्थितीशी ताळमेळ साधावाच लागेल. प्रवास करताना देखील सरावाकडे पाठ फिरवून चालणार नाही.’ भारताच्या अव्वल खेळाडूंना विश्रांती देत राष्ट्रकुलमध्ये दुय्यम दर्जाचा संघ पाठविणे योग्य राहील का, असा सवाल करताच गोपीचंद म्हणाले, ‘नाही. राष्ट्रकुल ही महत्त्वाची स्पर्धा असल्याने आम्हाला दुय्यम दर्जाचे खेळाडू पाठविता येणार नाही. 

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधू