शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सिंधू हरली, चायन ओपनमध्ये भारताचे आव्हान संपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2017 16:37 IST

भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूला शुक्रवारी चायन ओपन सुपर सीरिज प्रीमिअर बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.

ठळक मुद्देफांगजीचे फटके आणि तिच्या गतीमान खेळासमोर सिंधू पूर्णपणे निष्प्रभ ठरली.

फुजोऊ - भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूला शुक्रवारी चायन ओपन सुपर सीरिज प्रीमिअर बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. जागतिक क्रमवारीत दुस-या स्थानावर असलेल्या आणि गतविजेत्या सिंधूला चीनच्या गाओ फांगजीने 11-21, 10-21 असा सरळ दोन गेममध्ये पराभूत केले. सिंधूच्या पराभवसह भारताचे  चायन ओपन सुपर सीरिज प्रीमिअर बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. स्पर्धेत आव्हान जिवंत ठेवणारी सिंधू शेवटची स्पर्धक होती. 

फांगजीचे फटके आणि तिच्या गतीमान खेळासमोर सिंधू पूर्णपणे निष्प्रभ ठरली. महिला एकेरीमध्ये फांगजी 89 व्या स्थानावर आहे. पहिल्या गेममध्ये फांगजीने सलग सात गुण घेत 14-11 अशी आघाडी घेतली. जी शेवटपर्यंत तिने टिकवली. दुस-या गेममध्ये फांगजीने खेळावरील आपली पकड ढिली होऊ दिली नाही. तिने 21-10सह दुसरा गेम जिंकला. बॅडमिंटन कोर्टवरील त्यांचा हा पहिलाच सामना होता. 

सायना व प्रणय यांच्यासाठी कालचा दिवस निराशाजनक ठरला. या दोघांनी या महिन्यात नागपुरात खेळल्या गेलेल्या राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये जेतेपद पटकावले होते. सायनाला पाचव्या मानांकित जपानच्या अकाने यामागुचीविरुद्ध २१-१८, २१-११ ने पराभव स्वीकारावा लागला. जागतिक क्रमवारीत ११ व्या स्थानी असलेल्या प्रणयला ५३ व्या मानांकित हाँगकाँगच्या चियुक यिऊ लीविरुद्ध १९-२१, १७-२१ ने धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. 

सायनासाठी ही लढत आव्हानात्मक होती. कारण जपानच्या या खेळाडूविरुद्ध सायनाची कामगिरी चांगली नाही. या लढतीपूर्वी उभय खेळाडूंदरम्यान खेळल्या गेलेल्या तीन लढतींमध्ये यामागुचीने सरशी साधली. सायनाला या खेळाडूविरुद्ध चौथ्यांदा पराभव स्वीकारावा लागला.

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधू