शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2018: हॅट्स ऑफ पी. व्ही. सिंधू!

By स्वदेश घाणेकर | Updated: August 27, 2018 14:55 IST

Asian Badminton 2018: पी. व्ही. सिंधू.... भारतीय क्रीडा विश्वात फुलराणी सायना नेहवालनंतर मानाने घेतलं जाणर नाव... चिनी खेळाडूंची मक्तेदारी मोडण्याची शिकवण सायनाने भारतीयांना दिली आणि त्यावर सिंधूने जेतेपदांचा डोलारा उभा केला.

पी. व्ही. सिंधू.... भारतीय क्रीडा विश्वात फुलराणी सायना नेहवालनंतर मानाने घेतलं जाणर नाव... चिनी खेळाडूंची मक्तेदारी मोडण्याची शिकवण सायनाने भारतीयांना दिली आणि त्यावर सिंधूने जेतेपदांचा डोलारा उभा केला. सिंधूने आशियाई स्पर्धेतही सायनाच्या एक पाऊल पुढ टाकले आहे. आशियाई स्पर्धेत महिला एकेरीत आणि 1982 नंतर एकेरीतील पहिले पदक जिंकण्याचा मान सायनाने पटकावला... उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागल्याने सायनाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. मात्र, सिंधूने त्याही पलिकडे झेप घेत अंतिम फेरीत प्रवेश केला. भारतीय महिला बॅडमिंटनपटूला प्रथमच महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश करता आला. 

सिंधूसाठी सोनेरी इतिहास आता एका विजयावर आहे. मंगळवारी तिला जेतेपदासाठी चायनीज तैपेईच्या ताय त्झुयिंगचा सामना करावा लागणार आहे. आशियाई स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंना एकदाही कांस्यपदकाची वेस ओलांडता आलेली नाही. भारताने 2014पर्यंत 8 कांस्यपदक जिंकली आहेत आणि त्यात 1982 साली सय्यद मोदी यांनी पटकावलेले एकेरीतील एकमेव पदक आहे. उर्वरीत 7 पदकं ही दुहेरी प्रकारात जिंकलेली आहेत. त्यामुळे यंदाच्या आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी एकेरीत दोन पदकं निश्चित करून इतिहास  घडवला.

त्यात सिंधूचे विशेष कौतुक करायला हवे. तिने सातत्यपूर्ण खेळ करताना 2018 हे वर्ष खऱ्या अर्थाने गाजवले. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दोन रौप्य आणि दोन कांस्य अशी चार पदकं तिच्या नावावर आहेत. अशी कामगिरी करणारी ती एकमेव भारतीय महिला बॅडमिंटनपटू आहे. त्याशिवाय ऑलिम्पिक स्पर्धेचे रौप्यपदक नावावर असलेली ती एकमेव भारतीय बॅडमिंटनपटू आहे. त्याला आशियाई स्पर्धेतील यशानं चार चाँद लावले... आशियाई स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारीही ती पहिलीच भारतीय आहे. त्यामुळे तिच्याकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. तिने अंतिम फेरीतील नर्व्हसनेसवर मात केल्यास सुवर्ण इतिहास लिहीण्यापासून तिला कोणीच रोखू शकत नाही आणि भारतीयांचीही तिच इच्छा आहे. 

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधूAsian Games 2018आशियाई स्पर्धाBadmintonBadmintonSportsक्रीडा