शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आशिया चॅम्पियनशीप : सायना, प्रणॉय यांना कांस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 05:55 IST

भारतीय शटलर सायना नेहवाल आणि एच.एस. प्रणॉय यांना आज येथे आशिया चॅम्पियनशीप बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला.

वुहान, चीन : भारतीय शटलर सायना नेहवाल आणि एच.एस. प्रणॉय यांना आज येथे आशिया चॅम्पियनशीप बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. भारतीय खेळाडूंना कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. या महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्रकुल स्पर्धेत दुसरे सुवर्ण पदक जिंकणारी सायना नेहवाल हिने जगातील दुसऱ्या क्रमांकाची खेळाडू आणि गतविजेती ताय जु यिंग हिच्याकडून २५-२७, १९-२१ असा पराभव स्विकारला. जगातील दहाव्या क्रमांकाचा खेळाडू प्रणॉय याला चीनच्या आॅलिम्पिक चॅम्पियन चेन लोंग याने १६-२१,१८-२१ असे पराभूत केले.दुसºया गेममध्ये सायना आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूच्या चुकांचा फायदा घेत ४-३ अशी आघाडीवर होती. मात्र त्यानंतर यिंग हिने आघाडी घेतली. अखेरीस दोन्ही खेळाडू १९-१९ अशा बरोबरीवर होत्या. मात्र सायनाच्या चुकीचा फायदा घेत यिंग हिने सामन्यात विजय मिळवला.प्रणॉय याला अनियमित खेळाचा फटका बसला. त्याने सुरुवातीलाच ५ -२ अशी आघाडी घेतली. मात्र ब्रेकपर्यंत चेन लोंग याने ११ -१० अशी आघाडी घेतली आणि अखेरपर्यंत आपला दबदबा कायम ठेवला.प्रणॉय याने दोन गेमपॉईंट वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र पहिला गेम तो वाचवु शकला नाही. दुसºया गेममध्ये चेन लोंगने सोपा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.(वृत्तसंस्था)सायना आणि ताय जु यिंग यांच्यातील १६ सामन्यात सायनाचा हा सलग आठवा आणि सत्रातील तिसरा पराभव आहे. या वर्षी इंडोनेशिया ओपनच्या अंतिम फेरीत आणि आॅल इंग्लंड चॅम्पियनशीपमध्ये सायना पराभूत झाली होती. ताय जु यिंग हिने ४ -१ अशा आघाडीने सुरुवात केली. ती ब्रेकपर्यंत ११-६ अशी आघाडीवर होती. मात्र त्यानंतर सायना हिने १५-१५ अशी बरोबरी साधली. त्यानंतर सायना हिने १८-१७ अशी आघाडी घेतली. मात्र त्यानंतर यिंग हिने २०-२० अशी बरोबरी साधली आणि नंतर गेम जिंकला.

टॅग्स :Saina Nehwalसायना नेहवाल