शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

ऑल इंग्लंड बॅडमिंटन: केंटो मोमोताची ऐतिहासिक कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 04:07 IST

जेतेपद पटकावणारा पहिला जपानी खेळाडू

बर्मिंगहॅम : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या जपानच्या केंटो मोमोता याने शानदार खेळ करताना डेन्मार्कच्या बलाढ्य व्हिक्टर अ‍ॅक्सेलसेन याचे तगडे आव्हान तीन गेममध्ये परतावून पहिल्यांदाच सर्वात प्रतिष्ठेच्या आॅल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावले. विशेष म्हणजे या स्पर्धेचे जेतेपद पटकावणारा मोमोता पहिला जपानी खेळाडू ठरला. त्याचवेळी महिला गटामध्ये चीनच्या चेन युफेई हिनेही पहिल्यांदाच या स्पर्धेत बाजी मारताना तैवानच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या ताय त्झू यिंगला नमविले.अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात व्हिक्टरकडे गेल्या २० वर्षांत या स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारा डेन्मार्कचा पहिला खेळाडू बनण्याची संधी होती. मात्र, मोमोताच्या नियंत्रित खेळापुढे त्याचा निभाव लागला नाही. तीन गेमपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात मोमोताने २१-११, १५-२१, २१-१५ असा विजय मिळवला. पहिला गेम गमावल्यानंतर व्हिक्टरने शानदार पुनरागमन करताना सामना १-१ असा बरोबरीत आणला. मात्र तिसऱ्या व अखेरच्या गेममध्ये मोमोताने आक्रमक खेळ करताना जेतेपदावर कब्जा केला.त्याआधी महिला गटात चीनच्या चेन युफेईने पहिल्यांदाच आॅल इंग्लंडचे जेतेपद पटकावताना जागतिक क्रमवारीतील अव्वल ताय त्झू यिंगचे आव्हान २१-१७, २१-१७ असे परतावले. दोन्ही गेममध्ये युफेईने मोक्याच्यावेळी गुणांची कमाई करत यिंगचे आव्हान परतविले. नियंत्रित खेळ आणि आक्रमक स्मॅश या जोरावर युफेईने कसलेल्या यिंगला पुनरागमनाची संधी दिली नाही.