शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कार पुन्हा महागणार? बीएस-६च्या दुसऱ्या टप्प्याची तयारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 06:10 IST

भारतीय वाहन उद्योग सध्या आपली वाहने भारत स्टेज - ६ (बीएस - ६) उत्सर्जन मानदंडांच्या दुसऱ्या टप्प्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत  आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पुढील वर्षी एप्रिलपासून कठोर उत्सर्जन नियमांची पूर्तता करावी लागणार आहे. त्यामुळे वाहन निर्माते त्यांची वाहने अपग्रेड करण्यासाठी गुंतवणूक करत असल्याने प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांच्या किमती पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे.

भारतीय वाहन उद्योग सध्या आपली वाहने भारत स्टेज - ६ (बीएस - ६) उत्सर्जन मानदंडांच्या दुसऱ्या टप्प्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. एकदा असे झाले की, उत्सर्जन मानके युरो-६ मानकांच्या बरोबरीने असतील. चारचाकी प्रवासी आणि व्यावसायिक वाहने प्रगत मानकांशी सुसंगत करण्यासाठी अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असणे आवश्यक आहे. अशा स्थितीत वाहन उत्पादकांचा उत्पादन खर्च वाढू शकतो, त्याचा भार अंतिमतः पुढील आर्थिक वर्षापासून खरेदीदारांनाच सोसावा लागेल, असे वाहन उद्योगातील तज्ज्ञांचे मत आहे.

कोणत्या भागावर लक्ष? प्रगत उत्सर्जन मानकांची पूर्तता करण्यासाठी, वाहनांना अशा उपकरणासह सुसज्ज करणे आवश्यक आहे. ज्यामुळे चालत्या वाहनाच्या उत्सर्जन पातळीचे परीक्षण शक्य होणार आहे. यासाठी हे उपकरण कॅटॅलिटिक कन्व्हर्टर आणि ऑक्सिजन सेन्सरसारख्या अनेक महत्त्वाच्या भागांवर लक्ष ठेवेल.नवीन नियमांच्या अंमलबजावणीमुळे वाहनांच्या एकूण किमतीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. 

नवीन वाहनांमध्ये काय सुविधा?nवाहन उत्सर्जन पातळी निश्चित केलेल्या मानकांपेक्षा जास्त होताय, हे उपकरण वाहनाची योग्य सर्व्हिस करण्याची वेळ आली, हे सांगण्यासाठी इशारा लाईट देईल.nयाशिवाय, वाहनामध्ये खर्च होणाऱ्या इंधन स्तराला नियंत्रित ठेवण्यासाठी वाहनांमध्ये प्रोग्राम केलेले इंधन इंजेक्टर देखील लावण्यात येतील. हे उपकरण पेट्रोल इंजिनला पाठवल्या जाणाऱ्या इंधनाचे प्रमाण आणि वेळेवरही लक्ष ठेवेल.

आणखी बदल काय? तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सेमीकंडक्टर चिपलाही इंजिनचे तापमान, ज्वलनासाठी पाठवलेला हवेचा दाब व उत्सर्जनातील कण यांचे निरीक्षण करण्यासाठी देखील अपग्रेड करणे आवश्यक आहे.

वाहन कंपन्या काय म्हणतात?टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक गिरीश वाघ म्हणाले की, कंपनी या परिवर्तनाच्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे आणि अभियांत्रिकी क्षमतेचा मोठा हिस्सा या विकासकामात गुंतला आहे. देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडियाचे कार्यकारी अधिकारी (कॉर्पोरेट अफेअर्स) राहुल भारती म्हणाले की, कंपनी बीएस - ६च्या दुसऱ्या टप्प्यासाठी देखील तयारी करत आहे.

कंपनीची सर्व वाहने बीएस - ६ची दुसऱ्या टप्प्यातील मानकांनुसार केली जातील. त्यासाठी इंजिनची क्षमता वाढवण्यावर विशेष भर दिला जाईल, असे प्रमुख वाहन उत्पादक महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष (ऑटोमोटिव्ह सेक्टर) विजय नाकरा यांनी म्हटले आहे.

२०२० १ एप्रिलपासून देशात नवीन उत्सर्जन मानक म्हणून भारतात बीएस-६ चा पहिला टप्पा लागू करण्यात आला होता.

७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक वाहन कंपन्यांना नवीनमानकांशी जुळवून घेण्यासाठी करावी लागली होती.

टॅग्स :carकार