मारुती सुझुकीने नुकतीच एक नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही व्हिक्टोरिस सादर केली आहे. ही एसयूव्ही कंपनीच्या लोकप्रिय ग्रँड विटारावर बेस्ड आहे. मात्र फिचर्सच्या बाबतीत, व्हिक्टोरिसने ग्रँड विटाराला फार मागे टाकले आहे. नवीन डिझाइन, हाय-टेक फीचर्स आणि मजबूत हायब्रिड इंजिनसह, व्हिक्टोरिस ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये ग्राहकांची पहिली पसंत बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. तर जाणून घेऊयात तिच्या खास 10 प्रीमियम फीचर्ससंदर्भात, ज्यांच्या समोर ग्रँड विटाराही मागे पडते.
Grand Vitara च्या तुलनेत Victoris मध्ये अधिक प्रिमियम फीचर्स -ADAS फीचर – Victoris मध्ये Level-2 ADAS मिळते. यात ऑटोमॅटिक ब्रेकिंग, अॅडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल आणि लेन कीप असिस्ट सारखे फीचर्स आहेत. हे ग्रँड व्हिटारामध्ये नाही.
ड्रायव्हर डिस्प्ले – Victoris मध्ये 10.25-इंचांचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आहे, तर Grand Vitara मध्ये तो 7-इंचांचा आहे.
इंफोटेनमेंट स्क्रीन – Victoris 10.1-इंचांचे टचस्क्रीन सिस्टम आहे, तर Vitara मधे 9-इंचांचे आहे.
साउंड सिस्टम – व्हिक्टोरिसमध्ये 8 स्पीकर, सबवूफर आणि डॉल्बी अॅटमॉस सपोर्ट आहे, तर ग्रँड विटारामध्ये फक्त 6 स्पीकर आहेत.
अँम्बियंट लाइटिंग – Victoris मध्ये 64-कलर अँम्बियंट लायटिंग देण्यात आली आहे. यामुळे केबीन प्रीमियम वाटते. Grand Vitara मध्ये हे फीचर नाही.
पॉवर्ड टेलगेट – व्हिक्टोरिसमधील टेलगेट जेस्चर कंट्रोलने उघडते, तर ग्रँड विटारामध्ये केवळ मॅन्युअल टेलगेट आहे.
CNG टँक डिझाइन – Victoris मध्ये अंडरबॉडी CNG टँक आहे, यामुळे साधारणपणे संपूर्ण बूट स्पेस मिळतो. Grand Vitara मध्ये बूट स्पेस कमी होतो.
सेफ्टी रेटिंग – Victoris ला आधीच BNCAP से 5-स्टार रेटिंग मिळाली आहे. तर Grand Vitara ही मिळालेली नाही.
मायलेज – स्ट्रॉन्ग हाइब्रिड Victoris 28.65 kmpl मायलेज देते, तर Grand Vitara 27.97 kmpl मायलेज देते.
Alexa कनेक्ट – Victoris मध्ये Alexa Auto व्हॉइस असिस्टंट आहे. यामुळे व्हाइस कमांडने नेव्हिगेशन, कॉल आणि अनेक फंक्शन कंट्रोल केले जातात.