शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

इलेक्ट्रिक बाइक पेट का घेतात? ही आहेत यामागची नेमकी कारणं...

By नितीन जगताप | Updated: November 6, 2022 05:30 IST

पेट्रोल-डिझेलच्या दरांनी शंभरी गाठल्यानंतर इलेक्ट्रिक वाहनांचे आकर्षण वाढीस लागले. त्यातही लोकांचा कल इलेक्ट्रिक बाइककडे अधिक आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दरांनी शंभरी गाठल्यानंतर इलेक्ट्रिक वाहनांचे आकर्षण वाढीस लागले. त्यातही लोकांचा कल इलेक्ट्रिक बाइककडे अधिक आहे. वापरण्यास सोपी आणि पेट्रोल-डिझेलचा खर्च नाही, असे त्यामागचे सोपे गणित. मात्र, जसजसा इलेक्ट्रिक बाइकचा खप वाढू लागला तसतशा त्यातील उणिवांची माहिती उजेडात येऊ लागली. त्यातलीच एक म्हणजे या बाइकना लागणाऱ्या आगी. इलेक्ट्रिक बाइकने पेट घेतल्याच्या बातम्यांची वारंवारता वाढली. का घेत असतील इलेक्ट्रिक बाइक पेट, जाणून घेऊ या... 

केंद्रीय समितीचा अहवाल काय सांगतो?इलेक्ट्रिक दुचाकीला लागणाऱ्या आगीचे कारण शोधण्यासाठी बनवण्यात आलेल्या केंद्रीय समितीने अहवाल सादर केला आहे. त्यानुसार बॅटरी डिझाइन आणि मॉड्यूल तसेच इलेक्ट्रिक स्कूटरच्या संपूर्ण बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीममध्ये (बीएमएस) गंभीर समस्या आहे. यामुळे बॅटरी जास्त गरम झाल्याने आग लागते. काही मोठ्या इलेक्ट्रिक स्कूटर कंपन्या त्यांच्या उत्पादनांची किंमत कमी करण्यासाठी कमी दर्जाचे साहित्य वापरत असल्याचे निरीक्षणही या समितीने नोंदवले आहे.

कोणती बॅटरी सुरक्षित?लिथियम फॉस्फेट बॅटरीचे वैशिष्ट्य म्हणजे ती उष्णता सहन करू शकते. तर लिथियम आयर्नमध्ये असे होत नाही. त्यामुळे या बॅटरींना आग लागण्याची शक्यता असते.का तापतात या बॅटऱ्या? चीन आणि तैवान या दोन देशांमध्ये बहुतांश बॅटऱ्यांचे उत्पादन होते.  इलेक्ट्रिक वाहनामध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व बॅटरी प्लास्टिकच्या कॅबिनेटसह असतात.  बॅटरी गरम झाल्यानंतर प्लास्टिक वितळते. यासोबतच त्याला जोडलेले सर्किटही वितळू लागते. यामुळे आगीचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. बॅटरी पूर्णपणे बंदिस्त असली तरीही उष्णता बाहेर पडते. जेव्हा बॅटरी गरम होते, तेव्हा स्राव वेगाने तयार होतो.  लिथियम आयर्नच्या बॅटऱ्या अधिक उष्णता सोडतात. त्यामुळे या बॅटऱ्यांऐवजी लिथियम फॉस्फेटच्या बॅटऱ्या वापरण्यास प्राधान्य दिले जात आहे. काय आहेत उपाय?शेलवरील आवरण मजबूत असावे. ‘हीट सिंक’ वापरायला हवे, परंतु बॅटरी ऑपरेटर सध्या ते वापरत नाहीत. याचे प्रमुख कारण म्हणजे स्वॅप करण्यायोग्य बॅटरी. या बॅटरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेल्या जातात. अशा स्थितीत बॅटरीमधील ‘हीट सिंक’ वाढल्यास त्याचे वजनही वाढते. त्यामुळे उचलण्यात काही अडचण येऊ शकते. त्यामुळे वजन मुद्दाम हलके ठेवण्यात आले आहे.

ई-बाइकमध्ये कोणत्या बॅटऱ्या वापरल्या जातात?ई-बाइकमध्ये लिथियम-आयर्न अर्थात लि-आयन (याला लायन असेही संबोधले जाते) या बॅटऱ्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात.स्मार्टफोन आणि लॅपटॉपमध्येही या बॅटऱ्यांचा वापर केला जातो.इतर बॅटऱ्यांच्या तुलनेत या वजनाने हलक्या आणि अधिक कार्यक्षम असल्याचे मानले जाते.या बॅटऱ्या चार्जिंगवेळी अधिक तापल्यानेच आतापर्यंतच्या दुर्घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे.

दुर्घटना टाळण्यासाठी...  गुणवत्तापूर्ण वाहन घ्या योग्य वेळेत चार्जिंग बंद करा वातावरण थंड असताना चार्जिंग करा इलेक्ट्रिक वाहन सावलीत उभे करा सुसंगत वेगाने वाहन चालवा नियमित सर्व्हिसिंग करा गाडी रात्रभर चार्जिंगला ठेवू नका.गाड्यांना कोण प्रमाणित करते?ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (आयसीएटी) या दोन संस्था भारतातील इलेक्ट्रिक गाड्यांना प्रमाणित करतात.

टॅग्स :Olaओला