शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

स्कूटरच्या आसनाखालील बहुपयोगी जागा पण वापरताना जपून

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 22:27 IST

स्कूटरच्या आसनाखालील जागा ही हेल्मेटसाठी प्रामुख्याने ठेवलेली असते. मात्र त्यात अनावश्यक वस्तू चेपून ठेवणे हे सातत्याने करणे चुकीचे आहे. त्याने हेल्मेटच्या काचेला धक्का पोहोचू शकतो तसेच सीटच्या लॉकचेही नुकसान होऊ शकते.

स्कूटरच्या आसनाखालील जागा ही हेल्मेटसाठी प्रामुख्याने ठेवलेली असते. मात्र त्यात अनावश्यक वस्तू चेपून ठेवणे हे सातत्याने करणे चुकीचे आहे. त्याने हेल्मेटच्या काचेला धक्का पोहोचू शकतो तसेच सीटच्या लॉकचेही नुकसान होऊ शकते. स्कूटर हा प्रामुख्याने शहरी उपयोगातील वाहनाचा प्रकार झाला आहे. महिलांपासून ते अगदी काहीशा वृद्धांपर्यंत सर्वांना चालवण्यास सोपे असे हे वाहन वाटते, तसेच त्यामध्ये सामान ठेवण्यास चांगलीच जागा असते, हेच वैशिष्ट्य या स्कूटरचे असल्याने लोकांची जास्त पसंती स्कूटरला मिळत आहे.मोटारसायकलच्या तुलनेत सामान वाहण्यास स्कूटरमध्ये असणारी आसनाखालील जागा हा स्कूटरसाठी असणारा एक प्लस पॉइंट. विशेष करून हेल्मेट ठेवण्यासाठी ही चांगली जागा आहे पण अनेकदा त्या जागेमध्ये हेल्मेटबरोबर अन्य वस्तू ठेवल्या जातात इतकेच नव्हे तर त्या अगदी चेपून बसवण्याचाही काही लोकांचा कल असतो. यामुळे मात्र ही जागा गच्च भरून जाते, मात्र त्यामुळे स्कूटरच्या आसन लॉक होण्यासाठी अगदी जोर लावून दाबले जाते. अशा प्रकाराने ही आसनाखालील जागा सातत्याने वापरली गेली तर त्या सीटचे लॉक खराब होण्याची शक्यता अधिक असते. विनाकारण अनावश्यक वस्तू कशाही प्रकारे कोंबल्या जाऊ नयेत, तसेच हेल्मेट सारख्या महत्त्वाच्या वस्तू नीट ठेवल्या जाव्यात हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे.स्कूटरच्या या आसनाखालील जागेचा वापर करताना बेफिकिरीने केला जाऊ नये. विशेष करून हाफ हेल्मेट ठेवणाऱ्यांनी त्याबाबत विशेष काळजी घ्यावी. हेल्मेटला असलेल्या प्लॅस्टिकच्या काचेवर त्यामुळे दबाव येतो व त्याला क्रॅक जाणे वा तुटणे यामुळे हेल्मेट पूर्ण चांगल्या प्रकारे वापरण्यास अयोग्य ठरणे, हे टाळणे गरजेचे आहे. हेल्मेटला लावलेली प्लॅस्टिक व्हिजनची बाब तुम्हाला धुळीपासून व वाऱ्यापासून तुमच्या डोळ्यांचे संरक्षण करीत असते. त्यामुळे हेल्मेटसाठी असणा-या या पुरेशा जागेत हेल्मेट नीट ठेवले जाईल याची काळजी घेतली जावी.हेल्मेटची काच वा प्लॅस्टिक व्हिजन तुटल्यास नवे घेता येते हे खरे असले तरी तसा खर्च तुम्ही किती वेळा करणार आहात, दुसरी बाब प्रवासामध्ये धूळ व वाऱ्यापासून तुमच्या डोळ्याचे संरक्षण करणारी हेल्मेटची ही प्लॅस्टिकची व्हिजन-काच नीट राहणे, त्याला स्क्रॅच न जाऊ देणे हे देखील गरजेचे असते. यासाठीच स्कूटरच्या आसनाखालील जागेचा वापर करताना हेल्मेट ठेवण्यास प्राधान्य द्या पण ते ठेवल्यानंतर वस्तू कशाही कोंबण्याची धडपड करू नका. त्यामुळे हेल्मेटची ही काच, अन्य वस्तू ज्या नाजूक असतात त्याही खराब होण्याची शक्यता असते.त्याचप्रमाणे लॉक खराब झाले तर तुम्हाला ते पुन्हा नवे बसवावे लागते किंवा अनेकदा ते नीट लागत नाही. अशा प्रकाराने स्कूटर रस्त्यावर पार्क करून महत्त्वाच्या वस्तू तशाच ठेवून निघून जाणेही धोक्याचे असते. सांगण्याचा मुद्दा असा की, हे सारे करताना तुम्ही तुमच्या आसनाखालील जागेचा, योग्य पद्धतीने वापर करणे गरजेचे आहे. छोट्या छोट्या गोष्टींचाही योग्य पद्धतीने विचार करण्याने तुम्ही तुमच्या स्कूटरच्या अशा अतिरिक्त भागांचे व हेल्मेटसारख्या महत्त्वाच्या साधनांची स्थिती चांगली राखण्यासही शिकले पाहिजे.