शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
3
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
4
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
5
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
7
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
8
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
9
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
10
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
11
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
12
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
13
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
14
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
15
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
16
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
17
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
18
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
19
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
20
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा

जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 13:57 IST

आधीचा स्पोर्टी लूक कमालीचा बदलण्यात आला असून स्टील्थ एयरक्राफ्ट डिझाइन देण्यात आले आहे. 

टीव्हीएस कंपनीने नुकतीच NTORQ 150 ही हायपर स्पोर्ट्स स्कूटर लाँच केली आहे. या स्कूटरची एक्स शोरुम किंमत १,१९,००० रुपये ठेवण्यात आली आहे. आधीचा स्पोर्टी लूक कमालीचा बदलण्यात आला असून स्टील्थ एयरक्राफ्ट डिझाइन देण्यात आले आहे. 

प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, एयरोडायनॅमिक विंगलेट्स, कलर्ड अलॉय व्हील्स, सिग्नेचर मफलर नोट यामुळे ही स्कूटर रेसिंगसारखी बनविण्यात आली आहे. अलेक्सा, स्मार्टवॉच इंटिग्रेशन, लाइव्ह इंटिग्रेशन, नॅव्हिगेशन आणि इतर ओटीए अपडेट्ससह ५०+ स्मार्ट वैशिष्ट्यांचा समावेश या स्कूटरमध्ये करण्यात आला आहे. 

TVS NTORQ 150 मध्ये 149.7cc, एयरकूल्ड, O3CTech इंजिन बसवण्यात आले आहे. हे इंजिन 13.2 PS 7,000 rpm वर आणि 14.2 Nm टॉर्क 5,500 rpm वर देते. 0–60 km/h चा वेग केवळ 6.3 सेकंदांत घेतला जातो. तसेच या स्कूटरमध्ये 104 km/h चा सर्वोच्च वेग घेण्याची क्षमता आहे. टर्न-बाय- टर्न नॅव्हिगेशन, व्हिईकल ट्रॅकिंग, लास्ट पार्क्ड लोकेशन, कॉल/मेसेजेस/सोशल मीडिया अलर्ट्स, राइड मोड्स, ओटीए अपडेट्स आणि कस्टम विजेट्ससह ५० हून अधिक कनेक्टेड वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. तसेच अडॅप्टिव्ह टीएफटी डिस्प्ले, ४ वे नॅव्हिगेशन स्विच आणि इंटिग्रेटेड टेलिमॅटिक्स इंटरफेस देण्यात आला आहे. 

टेलिस्कोपिक सस्पेन्शन, अडजस्टेबल ब्रेक लिव्हर्स, पेटंटेड ई- झेड सेंटर स्टँड, स्कूटर एबीएस आणि ट्रॅक्शन कंट्रोलसह देण्यात आले आहे. एवढेच नाही तर चोरीविषयक अलर्ट्स, हझार्ड लॅम्प्स, इमरजन्सी ब्रेक वॉर्निंग आणि फॉलो मी हेडलॅम्प्स देण्यात आले आहेत. २२ लीटरची बुटस्पेस देण्यात आली आहे. स्टेल्थ सिल्व्हर, रेसिंग रेड, टर्बो ब्लू  अशा रंगासह नायट्रो ग्रीन, रेसिंग रेड आणि टर्बो ब्लू टीएफटी क्लस्टरचे रंग देण्यात आले आहेत. 

टॅग्स :motercycleमोटारसायकल