शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मेरे सपनों की गाडी कब आएगी तू...; जुन्या कारला स्मार्ट कारमध्ये बदला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 09:31 IST

ज्यांच्याकडे गाडी नसते ते आपल्याकडे गाडी कधी येणार, याचा विचार करतात. ज्यांच्याकडे गाडी असते ते कारमालक आपली गाडी अधिक अपग्रेडेड कशी होईल, याचा विचार करत असतात

विनय उपासनी, मुख्य उपसंपादक

एका ठिकाणाहून दुसरीकडे अगदी विनासायास जाता यावे, यासाठी गाडी हवी, अशी पूर्वीची धारणा होती. त्यावेळी गाडीच्या इंजिनची अधिक काळजी घेतली जाते. आताही गाडीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हाच असला तरी त्याला आता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे. म्हणजे काय तर माझ्या गाडीत कोणकोणते फिचर्स आहेत किंवा असावेत, याचा विचार प्रत्येकजण करू लागला आहे. थोडक्यात माझी गाडी स्मार्ट असावी, असा प्रत्येकाचा कल असतो. या सर्व पार्श्वभूमीवर गाडी स्मार्ट असणे म्हणजे काय, पाहू या. तुमची गाडी जुनी असली तरी तिच्यात पुढील काही तांत्रिक गोष्टी ॲड करणे ही आजच्या काळाची गरज आहे.

ज्यांच्याकडे गाडी नसते ते आपल्याकडे गाडी कधी येणार, याचा विचार करतात. ज्यांच्याकडे गाडी असते ते कारमालक आपली गाडी अधिक अपग्रेडेड कशी होईल, याचा विचार करत असतात. थोडक्यात काय जो तो आपापल्या स्वप्नातल्या कारचा विचार करत असतो...

कार ट्रॅकिंगनव्या गाड्यांमध्ये ही इनबिल्ट सिस्टीम असते. मात्र, जुन्या गाड्यांमध्ये डॅशबोर्डच्या खाली हे डिव्हाइस लावता येते. तुमची गाडी कुठे आहे, तिचे मेन्टेनन्स कधी करायचे आहे, आदी बारीकसारीक तपशील यात स्टोअर होतो. 

ब्लूटुथ ॲडाप्टर

गाडी चालवताना आवडीचे संगीत वा गाणी ऐकणे सुरू असते. पूर्वी सीडी प्लेअर गाडीत असायचा. आता त्याची जागा ब्लूटूथ ॲडाप्टरने घेतली आहे. मनपसंत गाणी या ब्लूटूथ ॲडाप्टरच्या साह्याने ऐकता येतात.  गाडीची किल्ली हरवणे ही आपल्यासाठी अगदी सामान्य बाब आहे. 

किल्ली हरविल्यानंतर होणारी जिवाची तगमग प्रत्येक कार मालकाला परिचयाची असते. त्याचवेळी ती वेळखाऊ प्रक्रियाही असते. अशावेळी की ट्रॅकर कामास येते. सध्या वाहनविक्री क्षेत्रात बॅटरीवर चालणाऱ्या अनेक की ट्रॅकर उपलब्ध आहेत. तसेच ॲपलाही ते जोडता येते.

डॅशबोर्डवरील कॅमेरा

हल्ली गाडी ड्राइव्ह करताना त्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग करण्याचे फॅड आहे. अशा परिस्थितीत डॅश कॅम उपयोगाला येतो.  गाडीच्या विंडशिल्ड वा डॅशबोर्डवर हा कॅमेरा लावता येतो. 

सध्याच्या गाड्यांमधील फिचर्ससमोर असलेल्या गाडीचा वेग कमी झाल्यास आपल्या गाडीचाही वेग कमी होतो.ड्रायव्हरला झोप लागत असेल किंवा पेंग आली तर वॉर्निंग बीप वाजते. रस्त्यालगत असलेल्या गाइडलाइन्सनुसार गाडी आपोआप वळते. सहा एअर बॅग्ज, सेन्सर्स, गाडीचा वेग नियंत्रित करण्यासाठी ऑटो लॉक

टायर सेफ्टी मॉनिटरटायरचे आयुष्य किती. त्याची किती झीज झाली आहे, वगैरे सांगणारे हे तंत्रज्ञान आहे.

 

 

टॅग्स :carकार