शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

Tips For Selling Used Car: जुन्या कारलाही मिळेल जबरदस्त किंमत, फक्त विकण्यापूर्वी लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 15:21 IST

Tips For Selling Used Car: जर तुम्ही तुमची जुनी कार विकण्याचा विचार करत असाल तर तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच असेल की तुम्हाला माहित नाही की ही कार कितीमध्ये विकली जाईल. पण तुम्ही कार विकण्यापूर्वी या टीप्स नक्की फॉलो करा.

जर तुम्ही तुमची जुनी कार विकण्याचा विचार करत असाल तर तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच असेल की तुम्हाला माहित नाही की ही कार कितीला विकली जाऊ शकेल. मात्र, यासोबतच तुम्ही कारची किंमतही तुमच्या मनात ठेवली असेल की, तुम्हाला कार कोणत्या किंमतीला विकायची आहे. परंतु, एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, जर तुम्हाला तुमच्या जुन्या कारला चांगली किंमत मिळावी असं वाटत असेल तर काही टीप्स फॉलो करायला हव्या. चला तर मग जाणून घेऊ कोणत्या आहेत या टीप्स.

कार वॉशअनेकजण आपल्या कारची काळजी तर घेतच असतात. रोज कार धुतलीही जात असेल. परंतु जर तुमच्याकडे एखादा ग्राहक कार पाहण्यासाठी येत असेल, तर त्याच्या येण्यापूर्वी कार धुवून घ्या. जेणेकरून जेव्हा तो ग्राहक कार पाहिल तेव्हा त्याच्या मनात ती भरली जाईल आणि त्याला तो घेण्याचा मोहही होऊ शकतो.

एक्सटिरिअरची काळजीऊन, पाऊस अशा अनेक गोष्टींचा आपल्या कारच्या रंगावर परिणाम होत असतो. जर तुमच्या कारचा रंग फिका पडला असेल तर विक्रीची तयारी करण्यापूर्वी नक्कीच रबिंग करून घ्या. म्हणजेच तुमच्या कारचा रंग पुन्हा चमकू लागेल. त्याचा ग्राहकावर चांगला प्रभाव पडतो.

इंटिरिअरची काळजीकारचं एक्सटिरिअर जितकं महत्त्वाचं असतं, त्यापेक्षाही अधिक कारचं इंटिरिअरही महत्त्वाचं असतं. गाडीचे इंटिरिअर चांगले नसेल तर त्यात बसलेल्या व्यक्तीलाही ते आवडत नाही. त्यामुळे आतील भाग स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, कार आतून ड्राय क्लीन करण्यास विसरू नका. एखाद्या ग्राहकाच्या मनात तुमची कार भरण्यासाठी ती तितकीच टापटीप असणं गरजेचं आहे.

महत्त्वाची कागदपत्रेकार सोबतच तिचे पेपर्सही असणं तितकंच महत्त्वाचं आहे. इन्शुरन्स, पीयुसी, रजिस्ट्रेशन अशी कागदपत्रे महत्त्वाचीच असतात. त्यामुळे डील करताना हे पेपर्स आपल्यासोबत ठेवा. जेणेकरून कोणत्याही ग्राहकाला कागदपत्रांमुळे डील रद्द करण्याची संधी मिळणार नाही.

किंमत ठरवाआपण बहुतेक वेळी कार विकताना आपल्याला हवी असलेली किंमत समोरच्या व्यक्तीला सांगतो. परंतु ती व्यक्ती त्यात काही कमी करण्यास आपल्याला सांगते. अशावेळी आपल्याला नुकसान होण्याची किंवा ती डील बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला हव्या असलेल्या किंमतीपेक्षा थोडी किंमत अधिक सांगा. त्यामुळे काही निगोसिएशन झाल्यास तुम्हाला हवी आहे तितकीच किंमत मिळू शकेल.

टॅग्स :carकार