शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

चोराच्या उलट्या बोंबा! टेस्लाच्या कॅमेऱ्यांवर चीनची नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 07:36 IST

जगातील एक प्रमुख आणि प्रसिद्ध कंपनी असलेल्या ‘टेस्ला’ कंपनीच्या गाड्यांवर आता चीनने आक्षेप नोंदवला आहे.

हेरगिरी आणि चीन ह्यांचे काय नाते आहे हे काही वेगळे सांगायला नको. जगातल्या प्रमुख देशांमधल्या विविध संरक्षण संस्था, राजकारणातील महत्त्वाच्या व्यक्ती, प्रमुख व्यापारी संस्था, शास्त्रज्ञ अशा अनेकांवरती चीन कायम छुपेपणाने पाळत ठेवून असतो, असा आरोप अनेकदा केला जातो.  अगदी चिनी हॅकर्सचे जाळे आणि ह्या हॅकर्सला चीन सरकारचा असलेला छुपा पाठिंबा ह्यावरतीदेखील अनेकदा वादंग घडतात. मात्र आता ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असा नवाच प्रकार चीनच्या बाबतीत झाला आहे. 

जगातील एक प्रमुख आणि प्रसिद्ध कंपनी असलेल्या ‘टेस्ला’ कंपनीच्या गाड्यांवर आता चीनने आक्षेप नोंदवला आहे. गंमत म्हणजे ह्या गाड्यांमध्ये लावलेल्या कॅमेऱ्याद्वारे हेरगिरी होण्याची भीती चीनच्या सैन्याने  व्यक्त केली आहे. एवढेच नव्हेतर, चिनी सैन्याने आपल्या भागात टेस्लाच्या गाड्यांना प्रवेशबंदीदेखील जाहीर केली आहे. टेस्लाचे सर्वेसर्वा  एलॉन मस्क ह्यांनी जराही डगमगून न जाता, चीन सरकारला चांगलेच ठणकावले आहे.  आपल्या गाड्यांचा उपयोग हेरगिरीसाठी होत असल्याचे सिद्ध झाले, तर आपण ह्या गाड्याच बंद करू, असे एलॉन मस्क ह्यांनी जाहीरपणे- तेही खुद्द चीनमध्येच व्हर्च्युअल मुलाखत देताना सांगितले आहे.  

कोणत्याही देशात आपल्या वाहनाचा वापर अवैध कामासाठी होत असल्यास तिथेदेखील गाड्या तातडीने बंद करण्यात येतील, असेही ते म्हणाले. खरेतर, चीन ही जगातली गाड्यांसाठीची सगळ्यात मोठी बाजारपेठ. त्यातच सध्या इलेक्ट्रिक कार निर्मितीच्या क्षेत्रात इथे प्रचंड चढाओढ चालू आहे. गेल्या वर्षी टेस्ला कंपनीने आपल्या १,४७,४४५ गाड्या ह्या बाजारपेठेत विकल्या. चीनच्या ‘निओ इंक’कडून टेस्लाला जोरदार स्पर्धा  आहे. अलास्कामध्ये सध्या चीन आणि अमेरिकेच्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका चालू असतानाच हा वाद उभा राहिला आहे. जो बायडेन  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच अमेरिका आणि चीनमध्ये चर्चेची सुरुवात झालेली आहे. “अशा काळात दोन्ही देशांनी परस्पर विश्वासाचे अधिक घट्ट नाते निर्माण करायला हवे आहे,” असे आवाहनदेखील एलॉन मस्क ह्यांनी केले आहे. अमेरिका आणि चीनच्या संबंधावरती ह्या वादंगाचा काय परिणाम होतो हे बघणे औत्सुक्याचे असेल.

- प्रसाद ताह्मणकर (prasad.tamhankar@gmail.com)

 

टॅग्स :chinaचीन