ताकद एवढी की पेट्रोलवरील वाटत नाही, १०.५० लाखांत अडास अन् छोट्या रोबोटवाली SUV... अलिशान एमजी एस्टर

By हेमंत बावकर | Published: January 24, 2023 02:53 PM2023-01-24T14:53:52+5:302023-01-24T14:54:58+5:30

MG Astor Review in Marathi: साडे दहा लाखांत आता कोणती एसयुव्ही कार येते? मारुतीची ब्रेझाचे लो लेव्हल मॉडेल, टाटा नेक्सॉनचे लो एंड मॉडेल, एमपीव्ही अर्टिगा... यात काय काय येते? MGची Astor कधी पाहिलीय का? एकदा चालवून पहाच...

The power is so much that it doesn't feel like petrol, a car with Adas and a small robot AI for just 10.50 lakhs... Luxurious MG Astor Review in Marathi | ताकद एवढी की पेट्रोलवरील वाटत नाही, १०.५० लाखांत अडास अन् छोट्या रोबोटवाली SUV... अलिशान एमजी एस्टर

ताकद एवढी की पेट्रोलवरील वाटत नाही, १०.५० लाखांत अडास अन् छोट्या रोबोटवाली SUV... अलिशान एमजी एस्टर

googlenewsNext

- हेमंत बावकर

साडे दहा लाखांत आता कोणती एसयुव्ही कार येते? मारुतीची ब्रेझाचे लो लेव्हल मॉडेल, टाटा नेक्सॉनचे लो एंड मॉडेल, एमपीव्ही अर्टिगा... यात काय काय येते? किती मोठी टचस्क्रीन येते? मोठाला सनरुफ येतो का? तुम्ही फक्त बोलला आणि बोलल्या बोलल्या उघडतो का? एआय वाला रोबोट येतो का? नाही... आम्ही तुम्हाला याच किंमतीत हे सारे येते असे सांगितले तर... हो येते, अशी कार जी पेट्रोलवरील असून ताकद एवढी की डिझेलच्या एसयुव्हीला देखील फेस येईल. 

क्रूझ कंट्रोल, अडास, सेफ्टी फिचर्सने भरलेली अशी कार आहे एमजी एस्टर... आम्ही ही कार टेस्ट ड्राईव्हसाठी आणली होती. घाट रस्ता, एक्स्प्रेस हायवे, जुना मुंबई-पुणे हायवे, त्यावरचे मोठाले स्पीड ब्रेकर, ट्रॅफिक अशा परिस्थितीत २५० किमी चालविली. रात्रीच्या वेळी देखील लाईट थ्रोची समस्या जाणवली नाही. 

एमजी ही कंपनी काही वर्षांपूर्वीच भारतात आली आहे. आतापर्यंत एमजीने पाच सीटर, सात सीटर अशा चार कार लाँच केल्या आहेत. यातील एक कार ही प्युअर पेट्रोल आणि तिचेच ईलेक्ट्रीक व्हर्जन आहे ती म्हणजे अ‍ॅस्टर... सारे काही अ‍ॅटोमॅटीक असलेली कार आम्हाला कशी वाटली... चला पाहुया...

एमजीची ही कार मॅन्युअल ट्रान्समिशन तसे अ‍ॅटोमॅटीकमध्ये देखील आहे. आमच्याकडे अ‍ॅटोमॅटीक कार होती. पिक अपच्या बाबतीत कार सरस होती. कुठेही चढाला किंवा स्पीड ब्रेकरला कारने कच खाल्ली नाही. वाहतूक कोंडीमध्ये देखील कारने चांगली ताकद दिली. महत्वाची बाब म्हणजे याची सुरक्षा प्रणाली... कारच्या चारही बाजुला कोणत्याही अँगलने स्कूटर, कार किंवा अन्य कोणते वाहन आले की लगेचच तुमच्यासमोरील मोठ्या स्क्रीनवर कॅमेरे दिसायचे. यामध्ये कोणत्या बाजुला गाडी आहे, किती जवळ आहे हे सारे दिसायचे. यामुळे ज्यांना अंदाज येत नाही त्यांच्यासाठी हे फिचर खूपच छान होते. 

या कारमध्ये १४ प्रकारचे ऑटोनॉमस लेव्हल २ फिचर्स आहेत. कार उजव्या बाजुला आली की उजव्या ओआरव्हीएममध्ये काचेवरच ऑरेंज कलरचा इंडिकेटर ब्लिंक व्हायला सुरुवात व्हायची. म्हणजे जर तुमचे लक्ष समोर असेल तर तुमच्या डोळ्यांना काहीतरी ब्लिंक होताना दिसेल मग तुमचे लक्ष तिकडे जाईल. एक्सप्रेस हायवेवरून जाताना कारची अडास प्रणाली उत्तम कार करत होती. 

समोर ठराविक अंतरावर कार आली की आपोआप तुम्ही सेट केलेला क्रूझ कंट्रोलचा स्पीड कमी व्हायचा आणि ती गेली किंवा तुम्ही खुली असलेल्या लेनमध्ये गेलात तर आपोआप कारचा स्पीड वाढायचा. यामुळे ड्रायव्हिंग खुप सोपे झाले आहे. आतील एआय देखील चांगले काम करत होता. हॅलो अ‍ॅस्टर, ओपन सनरुफ म्हटले की लगेचच सनरुफ खुला व्हायचा. अशा जवळपास ३५ कमांड या एआयला देता येत होत्या. गाणे ऐकायचे असेल तर ते देखील बोलल्या बोलल्या लगेचच सर्च व्हाय़चे. 

एमजीने शहरात १२-१३ आणि हायवेवर १६-१७ चे मायलेज दिले. खड्डे किंवा स्पीड ब्रेकर असतील तर आतमध्ये अजिबात दणके जाणवत नव्हते. टायर आदळल्याचा हलकासा आवाज येत होता. इंजिनचाही आवाज खूप कमी होता. एवढी केबिन सायलंट होती. एमजी अ‍ॅस्टरचे इंजिन १४९८ सीसीचे आहे, परंतू डिझेलच्या १५०० सीसी इंजिनशी कंपेअर केले तर हे पेट्रोल इंजिन कुठेच कमी नव्हते. 

साऊंड सिस्टीम देखील चांगली होती. कुठेही कॉस्ट कटिंगच्या कारमध्ये स्पीकरमधून कर् कर् असा आवाज येतो तो येत नव्हता. आतील फिनिशही एकदम प्रिमिअम होते. पेट्रोल कार असल्याने आणि दणकट असल्याने मायलेजच्या बाबतीत या कारने निराश केले नाही. तसेच पिकअपही दमदार असल्याने कुठेही अंडर पावर अशी ही कार वाटली नाही. 

एवढी सारी फिचर्स एमजीने साडे दहा लाखांत (एक्स शोरुम) दिली आहेत. सर्व्हिसिंगचा खर्चही पाच ते सात हजारांच्या आसपास आहे. यामुळे इतर कंपन्यांच्या याच रेंजच्या कारच्या तुलनेत ही कनेक्टेड एसयुव्ही आम्हाला विन विन वाटली. एवढी मोठी टचस्क्रीन या रेंजच्या कारमध्ये नाहीच. या टचस्क्रीनवर म्युझिक प्लेअर, मॅप, एसी कंट्रोल आदी बरेच काही होते. 
 

Web Title: The power is so much that it doesn't feel like petrol, a car with Adas and a small robot AI for just 10.50 lakhs... Luxurious MG Astor Review in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.