शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पहिला येईल त्याला पहिली मिळणार! नव्या लूकमध्ये महिंद्रा स्कॉर्पिओ लाँच; मागचा दरवाजा 'गायब'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 20:01 IST

नव्या स्कॉर्पिओमध्ये सीट्स ते इंटिरिअरमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. यामध्ये कमांड सीट देण्यात आल्या आहेत.

गेल्या दोन दशकांपासून दादा, भाईंच्या गळ्यातील ताईत झालेली महिंद्रा स्कॉर्पिओ नव्या रुपात आली आहे. महिंद्राने New Scorpio-N भारतीय बाजारात नव्या रुपात, नव्या फिचर्समध्ये लाँच केली आहे. महिंद्रा या एसयुव्हीला ‘बिग डॅडी ऑफ एसयूवी’ (Big Daddy of SUVs) या नावाने देखील प्रमोट करत आहे. 

स्कॉर्पिओची बुकिंग ३० जुलैपासून सुरु होणार आहे. ऑनलाईन आणि डीलरशीपकडे अशा दोन्ही ठिकाणी ग्राहक ही कार बुक करू शकतात. पहिला येईल त्याला पहिली कार दिली जाईल. ३० मोठ्या शहरांमध्ये याची टेस्ट ड्राईव्ह ५ जुलैपासून सुरु केली जाईल. अन्य शहरांमध्ये १५ जुलैपासून टेस्ट ड्राईव्ह सुरु केली जाईल. स्कॉर्पिओची सुरुवातीची किंमत ११.९९ लाख रुपये आहे. शेवटचे व्हेरिअंट 19.49 लाख रुपयांना मिळेल.

नव्या स्कॉर्पिओमध्ये सीट्स ते इंटिरिअरमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. यामध्ये कमांड सीट देण्यात आल्या आहेत. यांची पोझिशन उंच असते. याचसोबत स्कॉर्पिओचा मागील दरवाजा उघडणार नाही. म्हणजेच मागील सीटवर जाण्यासाठी मध्यल्या सीटवरून जावे लागणार आहे. परंतू ते फोल्ड करण्याची गरज नाही. तिसऱ्या रोमध्ये जाण्यासाठी वेगळी जागा देण्यात आली आहे. 

2.0-लीटर mStallion चार सिलिंडर टर्बो पेट्रोल आणि 2.2-लीटर mHawk डिझेल इंडिन देण्यात आले आहे. 6-स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमैटिक ट्रांसमिशन यूनिट मध्येदेखील ही एसयुव्ही मिळणार आहे. या कारला चेन्नईच्या Mahindra Research Valley मध्ये बनविण्यात आले आहे. Mahindra Scorpio N चा इंस्ट्रूमेंट कंसोल पूर्णपणे डिजिटल आहे. 8-इंचाची टचस्क्रीन देण्यात आली आहे. सोनीचे 12 स्पीकर साउंड सिस्टिम देण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी सहा एअरबॅगही देण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :Mahindraमहिंद्रा