नवी दिल्ली - देशातील सर्वात पॉप्युलर फॅमिली कार मारूती अर्टिगा(Maruti Ertiga) आता आणखी स्वस्त झाली आहे. अलीकडेच केंद्र सरकारने जीएसटीमध्ये सुधारणा केली असून २२ सप्टेंबरपासून नवीन दर लागू होतील. त्यामुळे याचा थेट फायदा ग्राहकांना मिळणार आहे. जीएसटी कपातीनंतर मारूतीच्या अर्टिंगा व्हेरिएंट्सच्या विविध मॉडेलची किंमत घसरली आहे.
जाणून घ्या मारूती अर्टिगाची जुनी आणि नवीन किंमत
व्हेरिएंट | सध्याची किंमत | घसरलेले दर | नवीन किंमत | टक्केवारीत अंतर |
LXI (O) | Rs. 9,11,500 | Rs. 31,400 | Rs. 8,80,100 | 3.44% |
VXI (O) | Rs. 10,20,500 | Rs. 35,100 | Rs. 9,85,400 | 3.44% |
ZXI (O) | Rs. 11,30,500 | Rs. 38,900 | Rs. 10,91,600 | 3.44% |
ZXI Plus | Rs. 12,00,500 | Rs. 41,300 | Rs. 11,59,200 | 3.44% |
व्हेरिएंट | सध्याची किंमत | घसरलेले दर | नवीन किंमत | टक्केवारीत अंतर |
VXI | Rs. 11,60,500 | Rs. 40,000 | Rs. 11,20,500 | 3.45% |
ZXI | Rs. 12,70,500 | Rs. 43,800 | Rs. 12,26,700 | 3.45% |
ZXI Plus | Rs. 13,40,500 | Rs. 46,200 | Rs. 12,94,300 | 3.45% |
व्हेरिएंट | सध्याची किंमत | घसरलेले दर | नवीन किंमत | टक्केवारीत अंतर |
VXI (O) | Rs. 11,15,500 | Rs. 38,400 | Rs. 10,77,100 | 3.44% |
ZXI (O) | Rs. 12,25,500 | Rs. 42,200 | Rs. 11,83,300 | 3.44% |
सर्वात जास्त फायदा कोणाला होईल?
जर तुम्ही ZXi Plus पेट्रोल-ऑटोमॅटिक व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला सर्वात जास्त फायदा होईल. यावर थेट ४६,२०० रुपयांपर्यंत बचत होईल. इतर व्हेरिएंटच्या किमतीतही सरासरी ३.३% ते ३.५% पर्यंत घट होईल.
खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी
ही कपात सणासुदीच्या काळातच लागू केली जात आहे, ज्यामुळे अर्टिगाची मागणी आणखी वाढू शकते. जागा, आराम आणि कमी देखभाल खर्चामुळे ही MPV आधीच भारतीय कुटुंबांची पहिली पसंती आहे. त्यात दिवाळी, दसरा या सणांमध्ये अर्टिगाच्या खरेदीत वाढ होण्याची शक्यता अधिक आहे.