शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अर्टिगा, XL 6 ही नकोशी वाटेल! मारुती नवी सात सीटर एमपीव्ही आणतेय; काउंट डाऊन सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 17:30 IST

कंपनीने नुकताच या कारचा टीझर लाँच केला आहे. यामध्ये कारची बॉडी, लुक आणि डिझाईनची माहिती देण्यात आली आहे.

मारुती सुझुकीने आपला गिअर बदलला आहे. मारुतीने आपल्या नव्या सात सीटर कारच्या नावाचा खुलासा केला आहे. मारुतीच्या या नव्या कारचा लुक पाहता ती सध्याच्या अर्टिगा आणि XL 6 च्या लुकपेक्षा थोडी वेगळी आणि भारदस्त असणार आहे. 

कंपनीने नुकताच या कारचा टीझर लाँच केला आहे. यामध्ये कारची बॉडी, लुक आणि डिझाईनची माहिती देण्यात आली आहे. सुरुवातीच्या मिडीया रिपोर्टमध्ये या कारला Maruti Engage असे नाव असल्याचे सांगितले जात होते. परंतू आता कंपनीनेच Maruti Invicto असे नाव असल्याचे जाहीर केले आहे. 

अर्थात ही सात सीटर कार टोयोटा इनोव्हाचे पुढचे रुप असलेले Innova Hycross चीच कॉपी असणार आहे. मारुतीची ही कार सर्वात महागडी असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार Maruti Invicto चे बुकिंग सुरु झाले आहे. तसेच ही कार २० लाख रुपयांच्या किंमतीमध्ये आणली जाऊ शकते. 

मारुतीने टोयोटा हाइराइडरवर ग्रँड व्हिटारा लाँच केली होती. तसेच या नव्या कारमध्ये काही बाहेरुन बदल केले जाणार आहेत. मात्र, कारची साईज, अंतर्गत रचना आदी एकसारखीच असणार आहे. 

काय काय फिचर्स असतील...इनोव्हा हायक्रॉस दोन पॉवरट्रेन पर्यायांसह येते. पहिला पर्याय म्हणजे शुद्ध पेट्रोल पॉवरट्रेन जे 173 Bhp आणि 209 Nm टॉर्क निर्माण करणारे 2.0-लिटर पेट्रोल इंजिन वापरते. दरम्यान, इतर ड्राइव्हट्रेन पर्याय देखील 2.0-लिटर पेट्रोल इंजिन वापरतो, परंतु हायब्रिड सेटअपसह येतो आणि जास्तीत जास्त 184 Bhp आणि 188 Nm टॉर्क निर्माण करतो.

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस सुपर व्हाईट, प्लॅटिनम व्हाईट पर्ल, सिल्वर मेटॅलिक, अॅटिट्यूड ब्लॅक मीका, स्पार्कलिंग ब्लॅक पर्ल क्रिस्टल शाईन, ग्रेडेड ब्रॉन्झ मेटॅलिक आणि ब्लॅकिश ग्लास फ्लेकमध्ये उपलब्ध आहे.  टोयोटा इनोव्हा हायक्रॉस टोयोटा न्यू ग्लोबल आर्किटेक्चर (TNGA) वर आधारित आहे.  ही एक मोनोकॉक एमपीव्ही आहे तर इनोव्हा क्रिस्टा एक लॅडर-ऑन-फ्रेम एमपीव्ही आहे. 

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीMarutiमारुती