जर तुम्ही नवीन वर्षात एमजी मोटरची कार घरी आणण्याचे स्वप्न पाहत असाल, तर तुमच्या खिशाला आता थोडा जास्त कात्री लागणार आहे. JSW MG मोटर इंडियाने जाहीर केले आहे की, जानेवारी २०२६ पासून ते त्यांच्या संपूर्ण मॉडेल्सच्या किमतीत वाढ करणार आहेत. कंपनीने नुकतीच एमजी हेक्टर कारची फेसलिफ्ट लाँच केली होती, तिच्याही किंमती २ टक्क्यांनी वाढणार आहेत.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. महागाईच्या दबावामुळे किमती वाढवणे अपरिहार्य असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ही दरवाढ एमजीच्या सर्व पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक कार्सवर लागू असेल.
एमजी मोटर इंडियाच्या ताफ्यातील खालील प्रमुख गाड्यांच्या किमतीत बदल होऊ शकतो: MG Hector: कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही. MG Windsor & MG Comet: इलेक्ट्रिक सेगमेंटमधील कार्स. MG ZS EV: प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूव्ही. MG Astor & MG Gloster: लक्झरी आणि मिड-साईज एसयूव्ही.
ग्राहकांसाठी शेवटची संधी? किमती वाढण्यापूर्वी ग्राहक सध्या सुरू असलेल्या 'इयर-एंड' डिस्काउंट आणि ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात. अनेक मॉडेल्सवर सध्या ३१ डिसेंबरपर्यंत आकर्षक सवलती दिल्या जात आहेत. त्यामुळे वाढीव किमती टाळण्यासाठी चालू महिना ही कार खरेदीची सर्वोत्तम वेळ ठरू शकते.
Web Summary : JSW MG Motor India will increase car prices from January 2026 due to rising raw material and production costs. The price hike will affect all models, including Hector, Comet, and ZS EV. Customers can avail of current year-end discounts before the price increase.
Web Summary : जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडिया कच्चे माल और उत्पादन लागत में वृद्धि के कारण जनवरी 2026 से कारों की कीमतें बढ़ाएगी। हेक्टर, कॉमेट और जेडएस ईवी सहित सभी मॉडल प्रभावित होंगे। ग्राहक मूल्य वृद्धि से पहले वर्तमान वर्ष के अंत की छूट का लाभ उठा सकते हैं।