शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

टाटाच्या नव्या कोऱ्या पंचला भररस्त्यात आग लागली; मालक, कुटुंब थोडक्यात बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 18:31 IST

टाटाची ही फाईव्ह स्टार रेंटिगवाली कार आहे. १ एप्रिलला प्रबल हे त्यांच्या कुटुंबासोबत गुजरातला जात होते. हेडलाईटमधून धूर येत असल्य़ाचे पाहून ते घाबरले.

टाटाची ऑटो मार्केटमध्ये सर्वाधिक खप असलेली कार टाटा पंचबाबत धक्कादायक बातमी येत आहे. या छोट्या एसयुव्हीला मुंबईहून गुजरातला जात असताना आग लागल्याची घटना घडली आहे. चालकाने प्रसंगावधान राखल्याने कारमधील सर्वांना बाहेर काढण्यात आले, परंतू कार काही वाचविता आली नाही. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. महत्वाचे म्हणजे ही कार नवी कोरी होती. 

गुजरातच्या नवसारी येथील ही घटना आहे. अलीपूर गावाजवळ ही कार आली असता कार मालक असलेल्या प्रबल यांना कारच्या डाव्या बाजुच्या हेडलाईटमधून धूर येत असल्याचे लक्षात आले. महिनाभरपूर्वीच ही कार घेतली होती. पहिली सर्व्हिसिंगही झाली नव्हती. टाटा पंचचा AMT Accomplished व्हेरिअंट त्यांनी खरेदी केला होता. ही कार जळून खाक झाली आहे. 

टाटाची ही फाईव्ह स्टार रेंटिगवाली कार आहे. १ एप्रिलला प्रबल हे त्यांच्या कुटुंबासोबत गुजरातला जात होते. हेडलाईटमधून धूर येत असल्य़ाचे पाहून ते घाबरले. गाडी लगेचच रत्याच्या बाजुला थांबविली आणि बाहेर येऊन पाहिले तर हेडलँपला आगीने वेढले होते. यामुळे त्यांनी आत बसलेल्या कुटुंबीयांना गाडीबाहेर काढले. तिथल्या लोकांनी तातडीने फायर ब्रिगेडला याची माहिती दिली. फायर ब्रिगेडने आग विझविली, परंतू तोपर्यंत आगीने कार खाक झाली होती. कंपनीने यावर अद्याप काही खुलासा केलेला नाहीय. 

प्रबल यांनी या घटनेची माहिती डीलरला दिली आहे. तसेच टाटा मोटर्सची टीम या घटनेची चौकशी करत आहे. कारला आग लागण्याचे कारण समोर आलेले नाहीय. या घटनेचा एफएससी रिपोर्ट समोर आल्यावरच माहिती मिळू शकेल. 

कंपनीनं दिलं स्पष्टीकरण..."आम्ही या थर्मल घटनेचा शोध घेत आहोत. ग्राहकाला झालेला त्रास आम्ही समजू शकतो. सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. आम्ही ग्राहक आणि तपास यंत्रणांशी सर्व शक्य सहाय्य देण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि या दुर्दैवी घटनेमागचं कारणं शोधण्यासाठी तपशीलवार तपास करणार आहोत. टाटा मोटर्समध्ये वाहन आणि त्यांच्या वापरकर्त्यांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे, असं टाटा मोटर्सच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे.

टॅग्स :Tataटाटा