शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Tata Motors नं दिला झटका! १ मे पासून कारच्या किमती महाग, जाणून घ्या यामागचं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 12:45 IST

देशातील प्रमुख वाहन निर्माती कंपनी टाटा मोटर्सनं आपल्या पेसेंजर व्हेइकल लाइन-अपमधील वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली-

देशातील प्रमुख वाहन निर्माती कंपनी टाटा मोटर्सनं आपल्या पेसेंजर व्हेइकल लाइन-अपमधील वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. नुकतंच कंपनीनं आपल्या व्यावसायिक श्रेणीतील वाहनांच्या किमतीत वाढ केली होती. आता टाटा पंच, सफारी इत्यादींसारख्या कारच्या किमतीत वाढ केली आहे. कंपनीनं जारी केलेल्या पत्रकानुसार नवे दर १ मे २०२३ पासून लागू होणार आहेत. 

टाटा मोटर्सची कोणतीही कार खरेदी करण्याचा तुम्ही जर विचार करत असेल तर १ मेच्या आधीच वाहनांच्या किमती तपासून घ्या आणि लवकरात लवकर खरेदी करुन टाका. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार वाहनांच्या एक्स-शो रुम किमतीत जवळपास ०.६ टक्क्यांनी वाढ केली जाणार आहे. कोणती कार किती महाग होईल याची सविस्तर माहिती अद्याप कंपनीनं जाहीर केलेली नाही. वेगवेगळ्या मॉडलवर वेगवेगळ्या पद्धतीनं वाढीव किमती ठरवल्या जाणार आहेत. 

किंमत वाढण्याचं कारण काय?टाटा मोटर्सच्या म्हणण्यानुसार नव्या रियल ड्रायव्हिंग इमिशन नॉर्म्स अंतर्गत वाहनांना अपडेट केल्यामुळे खर्चात वाढ झाली आहे. याच कारणामुळे वाहनांच्या किमती वाढवल्या जात आहेत. १ एप्रिल २०२३ मध्ये देशात नव्या रियल ड्रायव्हिंग इमिशन नॉर्म्स म्हणजेच BS6 फेज-२ लागू करण्यात आलं आहे. या नियमाअंतर्गत वाहन निर्मात्या कंपन्यांना वास्तवातील परिस्थितींमध्ये उत्सर्जन मानकांची पूर्तता करण्याची आवश्यकता असते. यासाठी कंपन्यांना आपल्या वाहनांना अपडेट करावं लागणार आहे. 

वर्षभरात दोनेवळा किमतीत वाढटाटा मोटर्स कंपनीनं या वर्षभरात दोनवेळा वाहनांच्या किमतीत वाढ केली आहे. याआधी कंपनीनं फेब्रुवारी महिन्यात आपल्या पेसेंजर वाहनांच्या किमतीत वाढ केली होती. त्यावेळी देखील कंपनीनं इनपुट कॉस्ट वाढल्याचं कारण देत जवळपास १.२ टक्क्यांनी वाढ केली होती. 

टॅग्स :Tataटाटा