शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

जबरदस्त मायलेज आणि फीचर्स, मारुती सुझुकीची लोकप्रिय कार स्विफ्ट S-CNG सोबत लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 13:00 IST

मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडनं भारतीय बाजारपेठेत आपली लोकप्रिय हॅचबॅक कार स्विफ्टचं सीएनजी व्हर्जन लाँच केलं आहे.

मारुती सुझुकीच्या सीएनजी कार्स या अन्य कंपन्यांच्या सीएनजी कार्सच्या तुलनेत उत्कृष्ट मानल्या जातात. जबरदस्त मायलेजसाठी या कार्स ओळखल्या जातात. अशातच आता मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडनं भारतीय बाजारपेठेत आपली लोकप्रिय हॅचबॅक कार स्विफ्टचं सीएनजी व्हर्जन लाँच केलं आहे. याचचं नाव स्विफ्ट एस-सीएनजी असं आहे. स्विफ्टचं फेसलिफ्ट व्हर्जन लाँच झाल्यानंतर अनेक लोक या कारची वाट पाहत होते. कंपनीनं ही कार VXi आणि ZXi या दोन व्हेरिअंटमध्ये सादर केली आहे. ही भारतातील सर्वात पॉवरफुल सीएनजी हॅचबॅक  कार आहे. कंपनीनं नव्या स्विफ्ट एस-सीएनजीसाठी #BeLimitless अशी टॅगलाईनही वापरली आहे. सातत्यानं नवं काही करण्याची ओढ असणारे 20 ते 30 या वयोगटातील तरुणांना आकर्षित करण्यासाठी ही कार सज्ज झाली आहे.

स्विफ्ट एस-सीएनजी त्याच 1.2-लिटर, 4-सिलिंडर, नॅचरली एस्पिरेटेड इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन मारुती सुझुकीच्या ड्युएलजेट, के-सीरीज इंजिन श्रेणीतील आहे. हे इंजिन 6,000 rpm वर 89 PS ची मॅक्सिमम पॉवर आणि 4,400 rpm वर 113Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. CNG वर असताना ही कार 6,000 rpm वर 77.49PS ची पॉवर आणि 4300 rpm वर 98.5Nm चा टॉर्क जनरेट करतेस्विफ्ट एस-सीएनजी  ही कार 30.90 किमी/किलो# चं मायलेज देते. इंजिनप्रमाणेच या कारमध्ये देण्यात आलेली फीचर्सही जबरदस्त आहे. यामध्ये ग्राहकांना मस्क्युलर बॉनेट, ब्लॅक-आऊट हनीकॉम्ब मेश ग्रिल आणि रुफ माऊंटेड अँटिना पाहायला मिळतो.

लायटिंग फीचर्सबद्दल सांगायचं झालं तर डीआरएलसह प्रोजेक्टर एलईडी हेडलाईट्स आणि रॅप-अराऊंड एलईडी टेललाईट्स देण्यात आले आहेत. याशिवाय कारमध्ये व्हायब्रंट पेंट स्कीम, 15 इंचाचे अलॉय व्हिल्स आणि विंडो वायपर्सचा समावेश करण्यात आलाय. तर दुसरीकडे सेफ्टी फीचर्समध्ये यात ड्युअल एअरबॅग्स, एबीएस, ईबीडी आणि रिअर व्ह्यू कॅमेराही दिला आहे. मारुती सध्या आपल्या एकूण अनेक मॉडेल्सची सीएनजी व्हेरिअंटमध्ये विक्री करते. यामध्ये ऑल्टो, वॅगनआर, सेलेरिओ, डिझायर, अर्टिगा, सुपर कॅरी, ईको, टूर-एससारख्या मॉडेल्सचा समावेश आहे.

Disclaimers:#As certified by Test Agency Under Rule 115 ( G) of CMVR 1989*Claim is subjected to the JATO Dynamics Fuel Efficiency Data.