मुंबई: स्कोडा ऑटो इंडियाने आपली सर्वाधिक लोकप्रिय SUV कुशाकच्या फेसलिफ्ट आवृत्तीचे आज अधिकृत अनावरण केले आहे. नवीन लूक, प्रगत सुरक्षा फीचर्स आणि अधिक लक्झरी केबिनसह ही कार भारतीय बाजारपेठेत एन्ट्री करण्यासाठी सज्ज झाली आहे. किमतींची घोषणा अद्याप झाली नसली, तरी या नवीन बदलांमुळे ह्युंदाई क्रेटा आणि आगामी टाटा सिएरा ईव्हीला मोठे आव्हान मिळण्याची शक्यता आहे. स्कोडाने बेस व्हेरिअंटमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो कंपनीसाठी खूप फायद्याचा ठरू शकतो.
नवीन कुशाक फेसलिफ्टमध्ये स्कोडाची नवीन सिग्नेचर ग्रिल, रिडिझाइन केलेले LED हेडलाईट्स आणि टेललाईट्स देण्यात आले आहेत. फ्रंट आणि रिअर बंपरला अधिक मस्क्युलर लूक देण्यात आला असून नवीन अलॉय व्हील्स कारच्या सौंदर्यात भर घालत आहेत. यावेळी स्कोडाने सुरक्षेवर अधिक भर दिला आहे. नवीन कुशाकमध्ये लेव्हल २ ADAS फीचर देण्यात आले आहे, ज्यामध्ये ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, लेन कीप असिस्ट आणि अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोलचा समावेश आहे. बेस व्हेरिअंटपासून कंपनीने कुशाकमध्ये सनरुफ देण्यास सुरुवात केली आहे. भारतीयांमध्ये सनरुफची प्रचंड क्रेझ आहे. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
कारमध्ये नवीन १०-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ३६०-डिग्री कॅमेरा, व्हेंटिलेटेड सीट्स आणि पॅनोरॅमिक सनरूफ यांसारखे प्रिमियम फीचर्स देण्यात आले आहेत. इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यात पूर्वीप्रमाणेच १.० लीटर TSI (११५ PS) आणि १.५ लीटर TSI (१५० PS) पेट्रोल इंजिनचे पर्याय मिळतील, जे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध असतील.
कोणाशी असणार स्पर्धा?बाजारात आल्यानंतर स्कोडा कुशाक फेसलिफ्टची थेट स्पर्धा ह्युंदाई क्रेटा, मारुती ग्रँड विटारा, किआ सेल्टोस आणि लवकरच येणाऱ्या टाटा सिएरा या गाड्यांशी होणार आहे.
Web Summary : Skoda Auto India unveils the Kushaq facelift with enhanced safety, luxurious interiors, and a redesigned exterior. Featuring Level 2 ADAS, sunroof in base variant, and updated infotainment, it challenges Hyundai Creta and upcoming Tata Sierra EV with 1.0L and 1.5L engine options.
Web Summary : स्कोडा ऑटो इंडिया ने कुशाक फेसलिफ्ट का अनावरण किया, जिसमें उन्नत सुरक्षा, शानदार इंटीरियर और नया बाहरी डिज़ाइन है। लेवल 2 एडीएएस, बेस वेरिएंट में सनरूफ और अपडेटेड इंफोटेनमेंट के साथ, यह हुंडई क्रेटा और आगामी टाटा सिएरा ईवी को 1.0L और 1.5L इंजन विकल्पों के साथ चुनौती देता है।