शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

नवी नको, सेकंड हँड कारच घरासमोर हवी; ग्राहकांची मागणी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 11:27 IST

बाजार जोमात, वित्त वर्ष २०२६-२७ पर्यंत जुन्या कारची विक्री ८० लाख युनिटपर्यंत जाऊ शकते. २०२६-२७ पर्यंत जुन्या कारच्या विक्रीत १९.५ टक्क्यांनी वाढ होऊ शकते.

मुंबई : ग्राहकांची सेकंड हँड कारला मागणी वाढली असून, सेकंड हँड कारचा बाजार मोठ्या प्रमाणात विस्तारला जात आहे. देशात सेकंड हँड म्हणजेच जुन्या कारचा बाजार २०२६-२७ पर्यंत वार्षिक १९.५ टक्के दराने (सीएजीआर) वाढेल, असा अंदाज एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

इंडियन ब्लूबुक आणि दास वेल्ट ऑटो यांनी २०२१-२२ या वर्षासाठी संयुक्तरीत्या हा अहवाल तयार केला आहे. अहवालाची ही पाचवी आवृत्ती आहे. जुन्या कार आणि बाइक बाजाराचा आढावा त्यात घेण्यात आला आहे. या अहवालानुसार, सध्या जुन्या कारचा बाजार २३ अब्ज डॉलरचा आहे. अहवालानुसार, गेल्या वित्त वर्षात देशात ३५ लाखांपेक्षा अधिक जुन्या कारची खरेदी-विक्री झाली. २०२०-२१ च्या विक्रमी आकड्यापेक्षा हा आकडा मोठा आहे. या काळात जागतिक पातळीवर ४ कोटींपेक्षा अधिक जुन्या कार विकल्या गेल्या आहेत. 

अहवालात म्हटले आहे की, वित्त वर्ष २०२६-२७ पर्यंत जुन्या कारची विक्री ८० लाख युनिटपर्यंत जाऊ शकते. २०२६-२७ पर्यंत जुन्या कारच्या विक्रीत १९.५ टक्क्यांनी वाढ होऊ शकते. या कालावधीत जुन्या कारचे नव्या कारसोबतचे गुणोत्तर १.९ पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

का वाढतेय मागणी?कोरोना साथीनंतर जुन्या कारच्या बाजारास मोठी गती मिळाली आहे. २०२६ पर्यंत छोट्या शहरांत जुन्या कारची मागणी वार्षिक ३० टक्के दराने वाढू शकते. प्रमुख ४० शहरांत हा दर १० टक्के राहण्याची शक्यता आहे. जुन्या वाहनांच्या बाजारातील वाढीस कारची उपलब्धता, खर्च करण्यायोग्य उत्पन्नामुळे कार व दुचाकी वाहनांच्या सरासरी मालकी कालावधीतील कपात आणि कमी कालावधीत नवीन मॉडेल बाजारात येणे यांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे ग्राहकांचे मन वळत आहे.

टॅग्स :carकार