ओला इलेक्ट्रिकने 4000 नवीन स्टोअर्स आणि सर्व्हिस सेंटर उघडण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अग्रवाल यांनी याबाबत माहिती दिली. आम्ही 25 डिसेंबर रोजी देशातील सर्व भागात ओलाचे नवीन स्टोअर्स आणि सर्व्हिस सेंटर उघडणार आहोत, असे भाविश अग्रवाल यांनी सांगितले. तसेच, त्यांनी याला सेव्हिंगवाला स्कूटर असे नाव दिले आहे. ओलाने नुकत्याच दोन स्वस्त इलेक्ट्रॉनिक स्कूटर लाँच केल्या आहेत. तर बजाज चेतकचे नवीन व्हर्जन 20 डिसेंबर रोजी लॉन्च होणार आहे. त्यामुळे ओलाचा हा निर्णय चेतकच्या लॉन्चशी जोडला जात आहे.
भाविश अग्रवाल म्हणाले की, 25 डिसेंबर 2024 पर्यंत आम्ही देशभरात 4,000 स्टोअर्स उघडणार आहोत. जे भारतातील प्रत्येक शहर आणि ग्रामीण भागात त्यांची उपस्थिती सुनिश्चित करतील. भाविश अग्रवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केले आहे की, ख्रिसमस 25 डिसेंबर रोजी रेकॉर्ड ब्रेकिंग 4,000 ओला इलेक्ट्रिक स्टोअर्सचे उद्घाटन केले जाईल. बचतीसह स्कूटर आता प्रत्येक शहर, गाव आणि तालुक्यामध्ये उपलब्ध होणार आहेत. तुमच्या जवळच्या स्टोअर्समध्ये इलेक्ट्रिक क्रांतीचा एक भाग व्हा.
नवीन आउटलेटमध्ये ग्राहक सहायता आणि विक्रीनंतरची सेवा चांगली बनवण्यासाठी सुविधा असतील. तसेच, भाविक अग्रवाल म्हणाले की, भारत वेगाने इलेक्ट्रिक मोबिलिटीकडे वाटचाल करत असताना, ओला इलेक्ट्रिकचे नेटवर्क विस्तार हा देशाच्या #EndICEAge च्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण क्षण असणार आहे. आमच्या विस्तृत D2C नेटवर्क आणि आमच्या नेटवर्क पार्टनर प्रोग्राम अंतर्गत टचपॉइंट्ससह, आम्ही टियर-I आणि टियर-II शहरांच्या पलीकडे संपूर्ण देश कव्हर करू.
दरम्यान, कंपनीने अलीकडेच दोन नवीन स्वस्त ईव्ही स्कूटर लाँच केल्या आहेत. कंपनीने ओला डिग, गिग +, एस 1 झेड आणि एस 1 झेड+ स्कूटर्सची डिझाईन शहरी, निमशहरी आणि ग्रामीण ग्राहकांना लक्षात ठेवून करण्यात आली आहे. तसेच, या स्कूटर्सची रेंज 39,999 रुपये इतकी आहे. ओलाच्या या स्कूटरची डिलिव्हरी एप्रिल आणि मे 2025 मध्ये सुरू होईल, ज्याची बुकिंग आता 499 रुपयांपासून सुरू होत आहे.