Sarla Aviation Air Taxi Testing:दिल्ली, मुंबई आणि बंगळुरूसारख्या शहरांमधील रोजच्या ट्रॅफिक जाममुळे तेथील लोक त्रस्त झाले आहेत. या शहरांचा विकास वेगाने होतोय, मात्र रस्ते जैसे थे आहेत. या ट्रॅफिक जामपासून सुटका कधी होणार ? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. याच प्रश्नाचे उत्तर भारतीय एअरोस्पेस स्टार्टअप सरला एव्हिएशनने दिले आहे. कंपनीने आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक एअर टॅक्सी प्रोग्रामची ग्राउंड टेस्टिंग अधिकृतपणे सुरू केली आहे.
कॉन्सेप्टपासून वास्तवाकडे वाटचाल
आतापर्यंत आकाशात उडण्यासाठी विमान किंवा हेलिकॉप्टरकडेच पर्याय म्हणून पाहिले जात होते. मात्र, येत्या काही वर्षांत चक्क इलेक्ट्रिक एअर टॅक्सिने प्रवास करताना येणार आहे. बंगळुरुमधील कंपनीच्या मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीमध्ये सुरू झालेली ही चाचणी केवळ सरला एव्हिएशनसाठीच नव्हे, तर भारताच्या खासगी एअरोस्पेस क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे. कंपनीचा 2028 पर्यंत लोकल कम्यूटसाठी इलेक्ट्रिक एअर टॅक्सी लॉन्च करण्याचा मानस आहे.
डिजिटल डिझाइनपासून रिअल टेस्टिंगपर्यंत
ग्राउंड टेस्टिंगच्या सुरुवातीसह सरला एव्हिएशनचा एअर टॅक्सी प्रोग्राम कोर व्हॅलिडेशन फेजमध्ये दाखल झाला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हा टप्पा डिजिटल कॉन्सेप्ट आणि लॅब-स्केल प्रयोगांपलीकडे जाऊन रिअल एअरक्राफ्ट-स्केल टेस्टिंगकडे नेणारा निर्णायक टप्पा आहे. याच टप्प्यावर कोणत्याही विमान प्रकल्पाची इंजिनीअरिंग क्षमता आणि सिस्टमची परिपक्वता प्रत्यक्षात तपासली जाते.
कमी वेळ, कमी गुंतवणूक अन् मोठी कामगिरी
अवघ्या 9 महिन्यांच्या विकास कालावधीत आणि जागतिक स्तरावरील अशा प्रकल्पांमध्ये लागणाऱ्या गुंतवणुकीच्या तुलनेत खूपच कमी भांडवलात हा टप्पा गाठणे, ही एक असाधारण कामगिरी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. हे यश भारतातील कोणत्याही खासगी एअरोस्पेस कंपनीने आजवर गाठलेल्या इंजिनीअरिंग स्केल, अंमलबजावणीची आणि सिस्टम मॅच्युरिटीचा नवा माइलस्टोन ठरत आहे.
SYL-X1 डेमॉन्स्ट्रेटर
सध्या चाचणीसाठी तयार करण्यात आलेले SYL-X1 हे एक फंक्शनल सब-स्केल एअरक्राफ्ट आहे. याचा उद्देश स्ट्रक्चरल बिहेवियर, प्रोपल्शन इंटिग्रेशन आणि सिस्टम-लेव्हल सेफ्टी आर्किटेक्चर यांची प्रत्यक्ष स्केलवर चाचणी करणे हा आहे. हे केवळ शैक्षणिक प्रोटोटाइप किंवा लहान आरसी-स्केल मॉडेल नसून, सुरुवातीपासूनच सर्टिफिकेशन लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आले आहे. भविष्यात 15 मीटर विंगस्पॅन असलेल्या फुल-स्केल एअरक्राफ्टचा पाया म्हणून हे डेमॉन्स्ट्रेटर काम करणार आहे.
जागतिक दर्जाच्या इंजिनीअरिंगचे उदाहरण
सरला एव्हिएशनचे को-फाउंडर आणि चीफ टेक्निकल ऑफिसर राकेश गोंकर यांनी सांगितले की, ही उपलब्धी दर्शवते की जागतिक अनुभव असलेले भारतीय अभियंते शिस्त, संयम आणि वर्ल्ड-क्लास स्टँडर्ड्ससह काम केल्यास काय साध्य करू शकतात. आमचा फोकस कधीच ‘सर्वात आधी’ होण्यावर नव्हता, तर टिकाऊ आणि दीर्घकाळ चालणारी प्रणाली उभारण्यावर होता, जेणेकरून एक मजबूत एव्हिएशन जायंट उभा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हवेत उडणारी टॅक्सी शहरी जामवर उपाय?
सरला एव्हिएशनचा फ्लॅगशिप प्रोग्राम हा 6-सीटर इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सी आहे. बंगळुरू, मुंबई, दिल्ली आणि पुण्यासारख्या अतिवर्दळीच्या शहरांमध्ये प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी हे एअरक्राफ्ट डिझाइन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, 2024 मध्ये बंगळुरू इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (BIAL) ने केम्पेगौडा इंटरनॅशनल एअरपोर्टवर इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सी सुरू करण्यासाठी सरला एव्हिएशनसोबत भागीदारी केली होती.
दोन्ही संस्थांमध्ये सस्टेनेबल एअर मोबिलिटीसाठी स्टेटमेंट ऑफ कोलॅबोरेशन साइन करण्यात आले असून, त्यात eVTOL एअरक्राफ्टवर विशेष भर देण्यात आला आहे. ग्राउंड टेस्टिंगच्या सुरुवातीसह हा स्वप्नवत प्रकल्प आता अधिक ठोस रूप घेत असून, भारताच्या शहरी वाहतुकीची व्याख्या बदलण्याची क्षमता यात दिसून येत आहे.
Web Summary : Sarla Aviation starts testing its electric air taxi program in India. Aiming to launch by 2028, this six-seater aircraft could revolutionize urban transport, reducing commute times in cities like Bangalore and Mumbai. The SYL-X1 demonstrator is designed for safety and certification.
Web Summary : सरला एविएशन ने भारत में इलेक्ट्रिक एयर टैक्सी कार्यक्रम का परीक्षण शुरू किया। 2028 तक लॉन्च करने का लक्ष्य, यह छह सीटर विमान बैंगलोर और मुंबई जैसे शहरों में यात्रा के समय को कम करके शहरी परिवहन में क्रांति ला सकता है। SYL-X1 प्रदर्शनकारी सुरक्षा और प्रमाणन के लिए बनाया गया है।