सध्या सगळीकडे जीएसटीची धूम सुरु आहे. जीएसटी कमी झाल्याची घोषणा झालीय, प्रत्यक्षात कर २२ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. मग जे थांबलेले आहेत त्यांची तुडुंब गर्दी विविध कंपन्यांचे शोरुम, दुकाने आणि ईकॉमर्स वेबसाईटवर होणार आहे. अशातच आता रॉयल एनफील्ड बुलेटचे एक जुने बिल व्हायरल होत आहे. त्या बिलावरील रक्कम पहाल आणि आता बुलेटवरील कमी झालेला जीएसटी पहाल तर तुमच्या एकच गोष्ट डोक्यात येणार आहे.
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती. आज बुलेटच्या किंमती या १.४९ लाखांपासून सुरु होत आहेत. तेव्हा ही बुलेट १८७०० रुपयांना मिळत होती. आज जीएसटी कपातीनंतर याच बुलेटची किंमत 1.37 लाख झाली आहे. बुलेटच्या व्हेरिअंटनुसार किंमतीत २२००० रुपयांपर्यंतची कपात झाली आहे.
Bullet 350 च्या या 1,76,625 – 2,20,466 किंमतीत 1,62,161 – 2,02,409 एवढी कपात झाली आहे. तर Classic 350 च्या या 1,97,253 – 2,34,972 किंमतीत 1,81,118 – 2,15,750 एवढी कपात झाली आहे. हंटर ३५० ची किंमत आता 1.37 लाख रुपये झाली आहे.
एकंदरीत ही कपात पाहता तेव्हाची बुलेट ज्या किंमतीला येत होती तेवढा तर आता जीएसटीच कमी झाला आहे. म्हणजे या ४० वर्षांत किंमतीत कितीने वाढ झाली आहे याचा विचार केला तर तेव्हा १८००० रुपयांना बुलेट ही आताच्या किंमतीपेक्षाही महागच म्हणावी लागेल. कारण तेव्हा लोकांचे एवढे उत्पन्न नव्हते. गावात एखादी मोटरसायकल, स्कूटर किंवा कार असली तर... फटफट असा आवाज पार अगदी डोंगरापलिकडे ती बुलेट जाईपर्यंत येत असायचा एवढी सर्वत्र स्मशान शांतता असायची. आज प्रत्येकाच्या घरात तीन चार गाड्या आलेल्या आहेत.