नवी दिल्लीः रस्ते वाहतुकीसंदर्भातील मोटर वाहन(संशोधन) विधेयक 2019ला मंजुरी देण्यात आली आहे. या विधेयकात रस्ते वाहतुकीचे नियम मोडल्यास कठोर दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. रस्त्यावर गाडी चालवताना थोडीशी चूक झाल्यास आपल्याला मोठा दंड भरावा लागणार आहे. बेदरकारपणे गाडी चालवणं किंवा हेल्मेटशिवाय गाडी चालवणं, सीट बेल्ट न बांधणं आणि दारूच्या नशेत गाडी चालवण्यासारख्या नियमांचं उल्लंघन केल्यास कठोर दंड भरावा लागणार आहे. ही दंडाची रक्कम पाहून भल्याभल्यांची भंबेरी उडाल्याशिवाय राहणार नाही.दारू पिऊन गाडी चालवल्यास आतापर्यंत दोन हजार रुपयांचं दंड ठोठावला जात होता. आता त्यासाठी 10 हजार रुपयांपर्यंतचा दंड वसूल करण्याची तरतूद करण्यात आली आहे. रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्याकडून हजार रुपयांचा दंड वसूल केला जात होता, आता तो हजार रुपयांचा दंड 5 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. परवान्याशिवाय गाडी चालवल्यास आधी 500 रुपये दंड दिला जात होता. आता तोच दंड 5 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्याला 400 रुपये दंड ठोठावला जात होता. परंतु आता या प्रस्तावात तीच रक्कम एक हजार ते दोन हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच सीट बेल्ट न वापरल्यास मोठा भुर्दंड द्यावा लागणार आहे. सीट बेल्ट लावलेला नसल्यास आधी 100 रुपये दंड द्यावा लागत होता.
500 ऐवजी 5000; ड्रायव्हिंगचे नियम मोडल्यास आता भरावा लागणार दुप्पट, चौपट किंवा दहापट दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 15:11 IST