शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

Renault Captur : खड्डेमय रस्त्यांचा त्रास की आरामदायी प्रवास? जाणून घ्या कसा आहे नवा पर्याय

By हेमंत बावकर | Updated: October 22, 2019 10:29 IST

लोकमतच्या टीमने ही डिझेल मॅन्युअल एसयुव्ही कार जवऴपास 800 किमी खड्ड्यांचा रस्ता, एक्स्प्रेस हायवे, डोंगर उताराच्या घाटातील रस्त्यावरून चालविली. कारचा पीकअप, सस्पेंन्शन, कंट्रोल आदी गोष्टी यावेळी अनुभवायला मिळाल्या. 

गेल्या काही वर्षांत एसयुव्ही क्रॉसओव्हर सेगमेंटला भारतीय कारप्रेमींचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मारुतीची ब्रिझा, फोर्ड इकोस्पोर्ट, टाटा नेक्सॉन सारख्या कार लोकांच्या मनात आहेत. पण आम्ही आज आणखी एक नाव सुचविणार आहोत रेनॉल्ट कॅप्चर. लोकमतच्या टीमने ही डिझेल मॅन्युअल एसयुव्ही कार जवऴपास 800 किमी खड्ड्यांचा रस्ता, एक्स्प्रेस हायवे, डोंगर उताराच्या घाटातील रस्त्यावरून चालविली. कारचा पीकअप, सस्पेंन्शन, कंट्रोल आदी गोष्टी यावेळी अनुभवायला मिळाल्या. 

रेनॉल्ट ही मुळची फ्रेंच कंपनी. युरोपचे स्टँडर्ड जरी भारतात दिलेले नसले तरीही भारतीय रस्ते आणि एकंदरीत वातावरण यानुसार केलेले बदल कारमध्ये जाणवतात. एक्स्प्रेस हायवेवर ही कार संतुलीत, वळणावर तोल जाऊ न देणारी आहे. कंट्रोलसाठीही चांगली आहे. अचानक खड्डा आला आणि ब्रेक दाबत खड्डा चुकविल्यास दणके आणि तोल गेल्याचा भास होत नाही. मुंबई-पुणे-सातारा (अंतर्गत रस्ते) असा तीन प्रदेशांचा प्रवास करताना खड्ड्यांची गणती न केलेलीच बरी. मात्र, तरीही या कारने खड्ड्य़ांचे धक्के जाणवू दिले नाहीत. मोठा खड्डा असल्यास थोडा खड्ड आवाज जरूर येत होता. स्टिअरिंग थोडे जड वाटले. 

1500 सीसीचे इंजिन असल्याने कारचा पिकअप चांगला होता. मात्र, सेकंड गिअरने काहीसे निराश केले. कार थोडी स्लो केल्यास पिकअप घेत नसल्याने इंजिन बंद पडत होते. मात्र, मांढरदेवी घाटात याच सेकंड गिअरवर फुल लोडेड असताना गाडीने चांगला पिकअप घेतला. पुण्यातील ट्रॅफिकमध्ये कारने चांगला परफॉर्म केला. मायलेजचा विचार कराल तर कारला 50 लीटरची टाकी आहे. दोन तासांची प्रचंड वाहतूक कोंडी, खड्ड्यांचे रस्ते, एसी, रात्रीच्या प्रवासात या कारने 14 ते 15 किमी प्रति लीटरचे मायलेज दिले जे एखाद्या एसयुव्हीसाठी चांगलेच म्हणावे लागेल. या काळात थकवा किंवा बॉडीरोल जाणवला नाही. मागील सीटवर तीन माणसे आरामात बसतात. त्यांच्यासाठी एसी व्हेंटही आहे. लेग स्पेसही आहे.  

लगेज स्पेस 392 लीटरची असल्याने साहित्यही चांगलेच ठेवता येते. मोठ्या प्रवासासाठी बूट स्पेस मोठी आहे. मागची सीट 60:40 अशी फोल्डेबल नसून पूर्णच फोल्ड करता येते. ही स्पेस जवळपास हजार लीटरवर जाते. 

 

उणिवा काय जाणवल्या?एसयुव्ही असली तरीही डोअर पॉकेटमध्ये पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी कमी म्हणजेच अर्धा लीटर बॉटलची जागा देण्यात आली आहे. रिअर व्हू मिररमुळे समोरचा काही भाग दिसत नाही. सी पिलरमुळेही वळणावर दिसत नाही. यामुळे चौकातून गाडी नेताना सांभाळावे लागते. एलईडी हेडलाईटमुळे पावसात साचलेले पाणी आणि रस्त्याचा फरक ओळखता येत नाही. यामुळे ओल्या रस्त्यावर खड्डे चुकविणे कठीण गेले. धुक्यामध्ये एलईडीच्या पांढऱ्या प्रकाशामुळे समोरची दृष्यमानता जवळपास शून्य झाली होती. फॉग लॅम्पही पांढरी लाईट फेकणारे असल्याने त्यांचाही उपयोग नाही. यावर कंपनीने काम करणे आवश्यक आहे.

 

 

चांगली कशासाठी? मजबूत बांधणी, कारचा पिकअप नाऊमेद न करणारा. इंजिन, टायरचा आवाज खूपच कमी. म्युझिक सिस्टीम, स्क्रीन चांगली. गिअर शिफ्टींग, क्लच स्मूथ. मायलेज चांगले. एसी कुलिंग योग्य. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर योग्य प्रकारे आणि आकर्षक मांडलेला. ब्राईटनेस कमी जास्त करता येतो. लेग स्पेस मोठी. ड्रायव्हर आर्मरेस्ट, मोठी बूट स्पेस, मागच्या सीटवर आर्मरेस्ट आणि मोठा ग्राऊंड क्लिअरन्स यामुळे ही कार उजवी ठरते. सुरक्षेसाठी एबीएस, ईबीडीसह एअरबॅग, रिव्हर्स पार्किंग सेन्सर कॅमेरा आहे. हेडलाईट, वायपरचे कंट्रोल मात्र उलट-सुलट दिलेेले आहेत. तर म्युझिकचे कंट्रोलही स्टिअरिंगवर नसून खालच्याबाजुला दिलेले आहेत.

टॅग्स :Renaultरेनॉल्टTataटाटाFordफोर्डMaruti Suzukiमारुती सुझुकी