शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कार रिव्हर्स घेण्यासाठी उपयुक्त असा बॅकअप कॅमेरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 19:00 IST

रिव्हर्स घेताना वा पार्किंग करताना मागे असणारे बॅकअप कॅमेरे वा रिव्हर्सिंग कॅमेरे आजकाल मोठ्या कारमध्ये दिसून येतात.

रिव्हर्स घेताना वा पार्किंग करताना मागे असणारे बॅकअप कॅमेरे वा रिव्हर्सिंग कॅमेरे आजकाल मोठ्या कारमध्ये दिसून येतात. आधुनिक काळातील ही एक उपयुक्त अशीच यंत्रणा आहे. कार मागे घेताना वा पार्किंग करताना मागील काचेतून पाठीमागची स्थिती पाहण्यासाठी मान अगदी वळवून पाहावे लागते. त्याचप्रमाणे बाहेरच्या आरशांमध्ये पाहावे लागते. हे करताना तसे पाहायला गेले तर सर्वतोपरी अंदाज येत नसला तरी बराचसा अंदाज येतो. मात्र कारच्या मागे नेमके जमिनीवर काय आहे, काही दगड आहे का, किंवा एखादा अडथळा आहे का, कोणी बसले आहे का, ते काही आरशांमधून स्पष्ट व लगेच दिसत नाही. यासाठी कार मागे घेताना कॅमेरा लावण्याचा शोध लागला व त्या कॅमेऱ्याद्वारे मागचे दृश्य ड्रायव्हरच्या बाजूला असेल्या स्क्रीनमध्ये किंवा आरशामध्ये दिलेल्या आधुनिक स्क्रीनमध्येही पाहता येऊ लागले. अनेक नवीन चालकांच्या दृष्टीने हा कॅमेरा खूपच उपयुक्त असा ठरला आहे.

आधुनिक कारमध्ये बहुतांशी उच्च श्रेणीमधील व मोठ्या किमतीच्या कारमध्ये कंपनीकडूनच हे कॅमेरे व त्यांचे स्क्रीन वा एलईडी स्क्रीन बसवून दिले जातात. ड्रायव्हिंगच्या दृष्टीने हे अतिशय सोयीचे व आधुनिक यंत्रणेचे मिळत आहेत. त्यात विविधता व वेगवेगळ्या प्रकारचा अंदाज येण्यासाठीही अन्य इलेक्ट्रॉनिक्सच्या सहाय्याने सुविधा दिलेल्या आहेत. जीपीएस यंत्रणआ, म्युझिक सिस्टीमचे पॅनेल यातही इनबिल्ट एलसीडी वा एलईडी स्क्रीनमध्ये ते मिळतात.

या कॅमेऱ्याला रिव्हर्स कॅमेरा किंवा बॅकअप कॅमेरा असे ओळखले जाते. १९५६ मध्ये पहिला बॅकअप कॅमेरा वापरण्यात आला. जनरल मोटर्स मोटोरोमामध्ये तो सादर करण्यात आला, रेअर व्ह्यू मिररच्या जागी टीव्ही स्क्रीन लावण्यात आला होता, मागे असलेल्या कॅमेऱ्याकडून मागील स्थिती त्या टीव्ही स्क्रीनवर आणली गेली होती. विशेष प्रकारचे कॅमेरे या कामासाठी वापरले जातात. आज हे कॅमेरे बसवणेही सहज झाले आहे. वायर कॅमेऱ्यापासून वायरलेस ब्लूटूथ कॅमेऱ्यापर्यंत हे उपलब्ध आहे. इतकेच काय त्याची क्लीपही सेव्ह करता येण्याची सुविधा काही कंपन्यांच्या या यंत्रणेने केली आहे. कारची मागे घेताना कुठे धडक होऊ नये यासाठी असलेले हे कॅमेरे कारच्या बंपरमध्ये किंवा मागील बाजूला रूफवर वा मागील काचेच्या आतील बाजूने बसवले जातात. मागे अंतर किंती आहे, भिंत आहे का, माणसे बसली आहेत का, काही अडथळा तेथे नेमका कुठे आहे हे सारे त्यात टिपले जाऊन ड्रायव्हरला तात्काळ स्क्रीनवर दिसते. किती अंतर आहे, त्याचे गणितही आकड्यांमधये दाखवणारे, मार्गदर्शक रेषा असणारे व त्याद्वारे कार मागे घेताना त्याचा फायदा चालकाला मिळावा, असे तंत्रही आज या कॅमेऱ्यामध्ये विकसित झाले आहे.  साधारण ५ हजारांपासून पुढे हे कॅमेरे मिळत आहेत. आता हे कॅमेरे पाश्चिमात्य देशांमध्ये कॉमन असले तरी भारतात अजून सर्वच कारना ते बसवले जात नाहीत, काही जण इलेक्ट्रॉनिक्सच्या बेभरवशी उत्पादित व बिगरहमी असलेल्या वस्तूंमुळे ते घेत नाहीत. तर चांगले कॅमेरे त्यांच्या किंमतीने परवडत नाहीत. तसेच भारतीय वातावरणात ते खऱाब होण्याचीही शक्यता असल्याने त्याचा वापर कमी होतो. मात्र असे कॅमेरे हे उपयुक्ततेमध्ये नक्कीच सरस आहेत, असेच म्हणावे लागेल.

टॅग्स :carकार