शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

PUC Certificate for Electric Vehicles: ईलेक्ट्रीक स्कूटरला देखील पीयुसी लागणार? ट्रॅफिक पोलीस पावत्यांवर पावत्या फाडतायत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 15:38 IST

नवीन गाडीला एक वर्ष झाले की पीयुसी प्रमाणपत्र बंधनकारक असते. आता या नव्या प्रकारावर हसावे की रडावे तेच लोकांना कळेनासे झाले आहे.

वाढत्या प्रदुषणामुळे आणि वाढत्या इंधनावरील खर्चामुळे देश आता इलेक्ट्रीक वाहनांकडे वळू लागला आहे. गेल्या दीड-दोन वर्षांत लाखो इलेक्ट्रीक गाड्या विकल्या गेल्या आहेत. अनेकांनी हौस म्हणून तर अनेकांनी पर्यावरण रक्षण, पैसे वाचविण्याच्या उद्देशाने या गाड्या घेतल्या आहेत. परंतू, त्यांना आता एका वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागत आहे. 

तसे नवीन गाडीला एक वर्ष झाले की पीयुसी प्रमाणपत्र बंधनकारक असते. परंतू, ते पेट्रोल, डिझेलच्या गाड्यांसाठी असते. कारण या गाड्यांमध्ये इंधन जळते आणि सायलेन्सरमधून धूर बाहेर पडतो. त्यात किती हाणीकारक वायू आहे, हे तपासण्याचे ती एक सरकारी प्रक्रिया आहे. यातून सरकारला देखील महसूल मिळतो. परंतू, आता या नव्या प्रकारावर हसावे की रडावे तेच लोकांना कळेनासे झाले आहे. वाहतूक पोलिसांच्या या अज्ञानावर आता नेटकरी हसू लागले आहेत. 

गेल्या काही काळात इलेक्ट्रीक वाहनांना पीयूसी प्रमाणपत्र नाही म्हणून फाईन मारल्याच्या घटना घडल्या आहेत. आता नुकतीच अशीच एक घटना केरळमध्ये घडली आहे. वाहतूक पोलिसांनी एथरच्या इलेक्ट्रीक स्कूटरला पीयूसी सर्टिफिकेट नसल्याने दंड आकारला आहे. ही स्कूटर आणि पावती आता नेटवर व्हायरल होऊ लागली आहे. पोलिसांनी दिलेल्या पावतीनुसार आणि गाडीच्या नंबरनुसार ही पावती पीयुसी सर्टिफिकेट नसल्याने फाडली गेल्याचे दिसत आहे. प्रत्येक राज्यात दंडाची रक्कम वेगवेगळी आहे. केंद्र सरकारच्या नव्या नियमांनुसार पीयुसी नसेल तर १००० रुपयांचा दंड आहे. परंतू, हे नियम आणि दंड ती ती राज्ये आपापल्या लोकांच्या हितानुसार बदलत असतात. या चलनावर २५० रुपयांचा दंड आहे. तसेच या चलनामध्ये मोटर वाहन कायदा १९८८ Section 213(5)(e) देखील नमुद आहे. 

इलेक्ट्रीक वाहनांना खरेच पीयुसी लागणार का?इलेक्ट्रीक वाहनांमध्ये इंधन जाळले जात नाही. यामुळे या वाहनांना इंजिन नसते तर मोटर असते. इंधन जाळत नसल्याने धूर निघत नाही, धूर नसल्याने तो बाहेर पडण्यासाठी सायलेन्सर नाही... आता जर सायलेन्सरच नसेल तर पीयुसी तपासणी करताना नळकांडे घालणार कशात? यामुळे या गाड्यांचा आणि पीयुसी सर्टिफिकेटचा दूरदूरवर संबंध नाही. आता सरकारला त्यांचे कायदे बदलावे लागतील नाहीतर अशा वाहतूक पोलिसांना ट्रेनिंग द्यावे लागणार आहे. यापूर्वीही कारमध्ये हेल्मेट न घातल्याचे चलन, दुचाकीस्वाराला सीटबेल्ट न लावल्याचे चलन देण्यात आले आहे. 

टॅग्स :KeralaकेरळPoliceपोलिस