शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ई-स्कूटरची खरेदी टाळताहेत लोक; ग्राहकांच्या मनात सुरक्षा आणि वाहनाच्या कामगिरीबाबत चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2022 08:13 IST

इलेक्ट्रिक वाहनांमध्ये आग लागण्याच्या घटना घडल्यामुळे या वाहनांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या मनात सुरक्षा आणि वाहनाची कामगिरी हे चिंतेचे मुद्दे बनले आहे.

मुंबई :

इलेक्ट्रिक वाहनांमध्ये आग लागण्याच्या घटना घडल्यामुळे या वाहनांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या मनात सुरक्षा आणि वाहनाची कामगिरी हे चिंतेचे मुद्दे बनले आहे. एका ऑनलाइन सर्वेक्षणातून असे निदर्शनास आले आहे की, याच कारणांमुळे लोक इलेक्ट्रिक स्कूटरची खरेदी टाळताना दिसून येत आहेत.ऑनलाइन मंच ‘लोकलसर्कल’ने हे सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार, इलेक्ट्रिक स्कूटरची सुरक्षितता आणि कामगिरी यांबाबतची अनिश्चितता यंदाच्या ऑगस्टमध्ये वाढून ३२% झाली. गेल्या वर्षी ती अवघी २% होती. सर्वेक्षणात २९२ जिल्ह्यांतील ११ हजारपेक्षा अधिक लोकांची मते जाणून घेण्यात आली. यातील ४७% लोक प्रथम श्रेणीच्या शहरांतील, तर ३३% लोक द्वितीय श्रेणीच्या शहरांतील आहे. २०% लोक तिसऱ्या व चौथ्या श्रेणींची शहरे तसेच ग्रामीण भागातील आहेत.

खरेदीची इच्छा मात्र...अनेक लोक इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यास इच्छुक आहेत. तथापि, त्यांना सुरक्षा व कामगिरी याबाबत चिंता वाटते. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ११ हजार लोकांपैकी केवळ १ टक्का लोकांनी पुढील ६ महिन्यांत इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचे निश्चित केले आहे.

सर्वेक्षणात काय आढळले?इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यास जास्त लोक इच्छुक नाहीत. ३१% कुटुंब इलेक्ट्रिक वाहन चालवत नाहीत. ०९% लोकांचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडे आधीच वाहन आहे व नवीन दुचाकी वाहन खरेदी करण्याची त्यांची कोणतीही योजना नाही.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर