शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दुचाकी दरवाढीची गती सुसाट; २ वर्षांत ३० ते ४० टक्क्यांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 08:37 IST

बरेचजण प्रसंगी अर्धवेळ नोकरी करून स्वप्नपूर्ती करतात; पण आता दुचाकीच्या दरवाढीची गती इतकी वेगवान झाली आहे की, तिच्याशी स्पर्धा करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.

- सुहास शेलारमुंबई : वयाची विशी ओलांडली की प्रत्येक तरुणाला दुचाकीचे वेध लागतात. जास्त महागडी नसली तरी किमान १५० सी.सी.ची (घन क्षमता) बाईक आपल्याकडे असावी असे त्यांचे स्वप्न असते. बरेचजण प्रसंगी अर्धवेळ नोकरी करून स्वप्नपूर्ती करतात; पण आता दुचाकीच्या दरवाढीची गती इतकी वेगवान झाली आहे की, तिच्याशी स्पर्धा करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.२०१९ पासून दरवाढीचे सत्र सुरू आहे. कोरोनाने त्यात अतिरिक्त भर घातली. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सहर्ष दमानी यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन वर्षांत दुचाकीचे दर जवळपास ४० टक्क्यांनी वधारले आहेत. धातूंच्या वाढलेल्या किमती त्यास मुख्यत्वे जबाबदार आहेत. कोरोनाकाळात उत्पादन आणि विक्रीवर परिणाम झाल्याने त्याचे पडसादही दरवाढीच्या आलेखावर उमटत आहेत.कोरोनाकाळात खाणकाम करणारा मजूर वर्ग गावी स्थलांतरित झाल्याने खनिकर्म उद्योग बंद ठेवावा लागला. धातूच्या वस्तू महागल्या. दुचाकीच्या निर्मितीसाठी प्रामुख्याने लोखंड, स्टील आणि अन्य धातूंपासून बनविलेल्या उपकरणांचा वापर केला जातो. उत्पादन खर्च वाढल्याने किमती वाढवाव्या लागल्या. ‘’सेमीकंडक्टर चिप’’ प्रक्रियेमुळे निर्मिती कालावधी वाढला आहे. सर्वाधिक विक्री होणाऱ्या दुचाकी बाजारात येण्यासाठी दोन महिन्यांचा विलंब होत आहे. त्यातुलनेत बुकिंग अधिक असल्याने त्याचा परिणामही दरवाढीवर होताना दिसत असल्याचे पॅलेडियम ऑटोमोटिव्हचे संचालक मयूर जैन यांनी सांगितले.आयातीवर परिणामभारतात उत्पादित होणाऱ्या दुचाकींसाठीचे निम्म्याहून अधिक स्पेअर पार्ट चीनमधून आयात केले जातात. कोरोनाने आयातीवर परिणाम केल्याने उत्पादन साहित्य पोहोचण्यास विलंब होत आहे. स्पेअर पार्टच्या किमतीही वाढल्या आहेत. निर्मितीपासून विक्रीपर्यंत सर्व घटक महागल्याने दरवाढ करावी लागली. हे अवलंबित्व संपत नाही तोवर महागाईचा आलेख चढाच राहील, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.सप्टेंबरमधील दुचाकी विक्री२०१९                २०२०             २०२१११,६४,१३५    १०,३३,८९५    ९,१४,६२१सर्वसाधारण किंमत (करांसहित)प्रकार         दोन वर्षांपूर्वी    आता१०० सीसी    ६५,०००        ८०,०००१२५ सीसी    ७०,०००       ९०,०००१५० सीसी    ८५,०००      १,२०,०००२०० सीसी    १,००,०००    १,५०,०००२२० सीसी    १,००,०००    १,६०,०००