शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदाच्या निडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
2
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
3
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
4
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
5
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
6
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
7
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
8
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
9
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
10
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
12
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
13
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू
14
प्रेमाचा त्रिकोण! आमच्या दोघींपैकी एकीला निवड; गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून पतीने केला मोठा कांड
15
२४ घरं, ४ प्लॉट, ४० एकर शेतजमीन... १५ हजार पगार असलेल्या क्लार्ककडे ३० कोटींचं घबाड
16
एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन 
17
एन चंद्रशेखरन यांच्या हाती पुन्हा टाटा सन्सची धुरा; IPO ची वाट पाहणाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा झटका
18
वडिलांचा मृत्यू, बॉयफ्रेंडसोबत पळाली आई; लेकाची पोलिसांत धाव, म्हणाला, "ते मला मारुन टाकतील..."
19
नोकरी सुरू होताच १५,००० रुपये तुमच्या खात्यात! मोदी सरकारने आणली 'ही' खास योजना, कंपनीलाही मिळेल फायदा!

आपल्याच मुलांसाठी आपलीच बेफिकिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 15:30 IST

Traffic:

-  रवींद्र बिवलकर(वरिष्ठ उपसंपादक)अमेरिका, युरोपमध्ये अ बाळंतपणानंतरही तान्ह्या बाळाला मोटारीतून घरी नेण्यापूर्वी रुग्णालय त्या बाळासाठी गाडीमध्ये सुयोग्य सीट आहे की नाही, याची खातरजमा करून मगच बाळाला घरी नेण्याची परवानगी त्याच्या पाल्याला देते. कायद्यानुसारही तेथे गाडीतील नेहमीच्या आसनावर ठेवण्याची स्वतंत्र बेबी सीट असणे बंधनकारक आहे.... आणि आपल्या देशात..? आपण लाखो रुपयांच्या गाड्या घेतो खरे, पण त्या वापरण्यासाठी आपण मानसिकदृष्ट्या सक्षम आहोत का ? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचारावा आणि त्याच्या उत्तरात नकारघंटा वाजावी अशी हतबल परिस्थिती आहे.

भारतातील वाहन मालक विशेष करून खासगी वाहन मालक आपल्या कुटुंबासाठी गाडीचा वापर करताना अनेकदा बेदरकारीने करतात. असुरक्षितता जोपासण्याचा चंगच जणू ते बांधतात. आपल्या लहान मुलांना खास करून बाळासाठीही त्यांची गाडीमधून नेण्यासाठी कसलीही काळजी घेतल्याचे दिसून येत नाही. युरोप व अमेरिकेप्रमाणे

वेगवान आणि पॉश गाड्या घेण्याची चढाओढ असली तरी सुरक्षिततेबद्दल तेथे असलेली जाणीव भारतात नाही. भारतात यासाठी ना कोणाच्या मनात पक्के विचार आहेत ना ठोस कायदे..? दोन महिन्यांच्या मुलाला लांबच्या प्रवासाला नेण्याबद्दल तूर्तास नको असे सांगितले जाते. कारण त्या बालकाची रोगप्रतिकारक क्षमता विकसित झालेली नसते, ती होऊ दे, असा सल्ला परदेशात दिला जातो. तर भारतात बेबी कार सीटची आवश्यकताही वाटत नाही. ज्या पालकांना त्याचे महत्त्व वाटते ते आपल्या अपत्याच्या सुरक्षिततेची काळजी म्हणून बेबी सीट वापरतात, इतकेच भारतातील या संबंधातील अवधान आहे.

आपल्याकडे बेबी सीटबद्दल कोणतीही तरतूद नव्हती. मात्र, २०१४ नंतर काही वाहनांसंबंधात तशी सीट कार निर्मात्यांना आवश्यक करण्यात आली आहे. त्या तरतुदीनुसार १ ऑक्टोबर २०१४ नंतरच्या वाहनात ती बेबी सीट संलग्न करण्याची सुविधा देण्यास सांगण्यात आले आहे. तर एप्रिल २०१५ पासून १२ वर्षांपर्यंतच्या मुलांना कारमध्ये योग्य जागा सुरक्षिततेसाठी द्यावी, असे स्पष्ट केले. यापलीकडे आपण कायद्याच्या दृष्टीने काहीही केलेले नाही..बेबी सीटबद्दलचे परदेशात असे आहेत नियम- युरोप वा अमेरिकेतील कायद्यानुसार आठ किलो वजनापेक्षा कमी किंवा एक वर्षापर्यंतच्या बाळासाठी आसनावर मागील बाजूला तोंड करून बसणारी सीट वापरावी, असे म्हटले आहे.- वर्षानंतर वा वीस किलोपर्यंत त्या बाळाचे वजन असेपर्यंत ते बाळ कारच्या पुढील दिशेला तोंड असणाऱ्या आसनावर बसवावे, आसनाला ती बेबी सीट बांधता यावी.- न्यूयॉर्कमधील कायद्यानुसार ४ वर्षाच्या मुलाला स्वतंत्र बेबी सीट अत्यावश्यक असून, दोन वर्षांखालील मूल हे स्वतंत्र बेबी सीटवर मागे तोंड केलेल्या दिशेने बसविले पाहिजे.- ४ ते ११ वर्षांपर्यंत स्वतंत्र वयोगटात विभागून त्यांच्यासाठी बेबी सीटवर बसून प्रवास करण्यासाठीही नियम आखून दिले गेले आहेत.

टॅग्स :carकार