शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

ओला ईलेक्ट्रीकने एस१ प्रो स्कूटरचे उत्पादन रोखले; कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 15:13 IST

ओला ईलेक्ट्रीकने कृष्णागिरी, तामिलनाडु प्लांटमध्ये एका आठवड्यासाठी इलेक्ट्रीक स्कूटरचे उत्पादन रोखले आहे.

ओला ईलेक्ट्रीक कंपनी गेल्या काही काळापासून वादाच्या भोवऱ्यात आहे. हायफाय स्कूटर लाँच केली, तरी तिच्यात एवढे दोष होते की ग्राहक वैतागले होते. हळूहळू ओला ईलेक्ट्रीक स्कूटर एस१ प्रोची मागणीही कमी होऊ लागली होती. त्यातच आता ओलाने एस१ प्रो स्कूटरचे उत्पादन आठवड्यासाठी रोखले आहे. 

ओला ईलेक्ट्रीकने कृष्णागिरी, तामिलनाडु प्लांटमध्ये एका आठवड्यासाठी इलेक्ट्रीक स्कूटरचे उत्पादन रोखले आहे. वार्षिक मेन्टेनन्स आणि अन्य मशीनरी बसविण्यासाठी हा प्लांट आठवड्याभरासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत माहिती असलेल्या ओलाच्या तीन सुत्रांनी  ही माहिती दिली आहे. जागरणने याचे वृत्त दिले आहे. उत्पादन ठप्प होण्यामागे इन्व्हेंटरीचा ढीग हे सर्वात मोठे कारण आहे. ओला कंपनीत सध्या ४००० स्कूटरचे उत्पादन सुरु आहे. कंपनीकडे सध्या अनेक हजार युनिट्स उपलब्ध आहेत जी कंपनीने ग्राहकांच्या प्री-ऑर्डर घेतल्या होत्या त्यांना पाठवण्यात येणार आहेत. 

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ओलाने ट्रायल उत्पादन सुरु केले होते. डिसेंबरपासून दररोज उत्पादन सुरु केले होते. यानंतर लोकांना दोन-तीन महिन्यांच्या विलंबाने स्कूटर मिळाल्या. मात्र, त्यामध्ये जवळपास २५ हून अधिक समस्या होत्या. काहींनी तर स्कूटरला वैतागून तिला आग देखील लावली. अनेकांच्या स्कूटरचे पुढचे चाक रॉडसह तुटून पडत होते. अनेकांना बॅटरीची समस्या येत होती. काही दिवस स्कूटर सुरु केली नाही की बॅटरी ड्रेन होत होती असे एका मागोमाग एक समस्या येत होत्या. या स्कूटरला आग लागल्याने विचारात असलेल्या लोकांनी पाठ फिरवली होती. या साऱ्याचा परिणाम कंपनीच्या स्कूटरच्या विक्रीवर झाल्याचे गेल्या महिन्यात दिसून आले आहे.   

टॅग्स :Olaओला