शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Ola इलेक्ट्रीक स्कूटरनंतर कार आणणार? सीईओ भाविश अग्रवाल यांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 16:11 IST

Ola Electric Car soon: Ola चे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ट्विटरवर ओला स्कूटर (Ola Scooter) चा फोटो पोस्ट करत कॅप्शन लिहिले होते की, पेट्रोलला हटवा, भविष्य इलेक्ट्रीकचे आहे. यावर त्यांना एक ट्विटर युजर बनी पुनियाने प्रश्न विचारला.

Ola Scooter ची स्कूटर अद्याप रस्त्यावर उतरलेली नसली तरी देखील तिचे लाँचिंग झाले आहे. किंमत जरा जास्त वाटत असली तरी लाखो बुकिंग मिळाली आहेत. आता ओलाचे सीईओ आणखी एका बड्या धमाक्याची तयारी करत आहेत. ट्विटरवर एका युजरला उत्तर देताना त्यांनी 2023 पर्यंत ओलाची Electric Car लाँच करण्याचे संकेत दिले आहेत. (Ola CEO Confirms Launch of Brand's First Electric Car by 2023, Vehicle in Research Phase)

Ola चे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ट्विटरवर ओला स्कूटर (Ola Scooter) चा फोटो पोस्ट करत कॅप्शन लिहिले होते की, पेट्रोलला हटवा, भविष्य इलेक्ट्रीकचे आहे. यावर त्यांना एक ट्विटर युजर बनी पुनियाने प्रश्न विचारला. तुमच्याकडे स्वत:ची खासगी कार कोणती आहे? पेट्रोल, डिझेल की इलेक्ट्रीक. यावर त्यांनी माझ्याकडे एक हायब्रिड कार असल्याचे सांगितले. 

भाविश यांनी सांगितले की, दोन महिन्यांपूर्वी माझ्याकडे कोणतीही कार नव्हती. आता एक हायब्रिड कार आहे. पुढील कार इलेक्ट्रीक असेल 2023 मध्ये, ती देखील ओलाची इलेक्ट्रीक कार.  महत्वाचे म्हणजे भाविश यांनी याआधीही एकदा Ola Electric Car बाबत ट्विट केले होते. मात्र, ते एप्रिल फूल होते. त्यांनी ओलाच्या इलेक्ट्रीक फ्लाईंग कारचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यानंतर लोकांना ते एप्रिल फुलची गंमत असल्याचे समजले होते. 

आता भाविश यांनी पुन्हा एकदा 2023 पर्यंत इलेक्ट्रीक कार लाँच करण्याचे संकेत दिले आहेत. परंतू त्यांनी डोळा मारतानाची स्माईली वापरली आहे. अशावेळी ते खरोखरच 2023 पर्यंत इलेक्ट्रीक कार आणतात का हे पहावे लागेल. 

टॅग्स :Olaओला