शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

टाटाच नाही, इंडियन आर्मीचा आणखी एक भारतीय कंपनीवर विश्वास; दिली 1,850 कारची ऑर्डर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 18:08 IST

महिंद्राला आर्मीकडून जानेवारीमध्ये 1,470 यूनिटची ऑर्डर मिळाली होती. ती पूर्ण करताच नवीन ऑर्डर मिळाली आहे.

महिंद्रा भारतीय सैन्यासाठी स्कॉर्पिओ ही एसयुव्ही तयार करत आहे. इंडियन आर्मीकडून महिंद्राला 1,850 यूनिट्सची ऑर्डर देण्यात आली आहे. स्कॉर्पिओ क्लासिकच्या आर्मीच्या खाकी हिरव्या रंगातील फोटो कंपनीने पोस्ट केले आहेत. यामध्ये स्क़ॉर्पिओचे जुने मॉडेल दाखविण्य़ात आले आहे. 

महिंद्राला आर्मीकडून जानेवारीमध्ये 1,470 यूनिटची ऑर्डर मिळाली होती. ती पूर्ण करताच नवीन ऑर्डर मिळाली आहे. आर्मीसाठी महिंद्रा डिझेलच्या कार पुरविण्याची शक्यता आहे. आर्मी टाटाची स्टॉर्म सफारी देखील वापरते. महिंद्राच्या या कारमध्ये जुना लोगो दिसत आहे. जुने ग्रिल आणि अलॉय व्हिल्स दिसत आहेत. ही कार सामान्य नागरिकांसाठी  2.2-लीटर एमहॉक इंजिनमध्ये मिळत होती. 132 पीएस ची ताकद आणि 300 एनएमचा पीक टॉर्क देते. 

महिंद्राने सशस्त्र दलांना पुरवल्या जाणार्‍या मॉडेलचे कोणतेही वैशिष्ट्य समोर आणलेले नाहीय. परंतू, या कारला अधिक शक्तीशाली बनविण्यात येणार आहे. 140 PS पॉवर आणि 320 Nm टॉर्क तयार करणे अपेक्षित आहे. तसेच केवळ पुढील चाकाला नव्हे तर चारही चाकांना ताकद म्हणजेच 4X4 असण्याची शक्यता आहे. 

कंपनी आता ही SUV भारतात दोन वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये ऑफर करते, त्यात Scorpio-N आणि Scorpio Classic यांचा समावेश आहे. स्कॉर्पिओ-एन ही अधिक आधुनिक आणि वैशिष्ट्यांनी भरलेली एसयूव्ही आहे. परंतू, स्कॉर्पिओ क्लासिकने आपला स्टान्स कायम ठेवला आहे. भारतीय लष्कराकडून याला पसंती देण्याचे हेही प्रमुख कारण आहे.

टॅग्स :Mahindraमहिंद्राIndian Armyभारतीय जवान