शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 09:46 IST

E20 petrol Mileage Problem: देशभरातील पेट्रोल पंपांवर आता E20 इंधन विकले जात आहे. वाहन कंपन्या देखील ई २० वर चालणारी वाहने बनवत आहेत. परंतू, खरी कोंडी झाली आहे ती जुन्या वाहन मालकांची.

इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे जुन्या वाहनांचे मायलेज सहा टक्क्यांनी कमी होते, हे केंद्र सरकारनेच मान्य केले आहे. एवढेच नाही तर वाहनाचा मेंटेनन्सही यामुळे वाढत आहे. यामुळे वाहन चालकांच्या या दाव्याला पुष्टी मिळत आहे. असे असले तरी फायदे पाहता मायलेजमधील खूप कमी असल्याची सारवासारव मंत्रालयाने केली आहे. हे  E20 इंधन वाहनचालकांना हवे आहे का? याबाबत काही सर्व्हे आले आहेत. प्रत्यक्षात हा आकडा खूप जास्त असल्याचे हा सर्व्हे सांगत आहे.  

देशभरातील पेट्रोल पंपांवर आता E20 इंधन विकले जात आहे. वाहन कंपन्या देखील ई २० वर चालणारी वाहने बनवत आहेत. परंतू, खरी कोंडी झाली आहे ती जुन्या वाहन मालकांची. देशात अद्याप करोडो वाहने ही जुन्या इंधनावरच चालणारी आहेत. यामुळे या वाहनचालकांना आता खिशाला भार आणि जिवाला घोर पडू लागला आहे. 

प्रत्येकी ३ पैकी २ कार मालकांनी त्यांच्या वाहनाच्या मायलेजमध्ये घट झाल्याचे म्हटले आहे. ज्यांची वाहने एप्रिल २०२३ पूर्वीची आहे त्यांना ही समस्या भेडसावू लागली आहे. सरकारने असेही मान्य केले आहे की काही जुन्या वाहनांच्या मायलेजमध्ये थोडीशी घट होऊ शकते आणि सदोष भागांवर थोडासा खर्च होऊ शकतो. 

लोकल सर्कलने केलेल्या सर्वेक्षणात पूर्वीच्या तुलनेत २०२२ किंवा त्यापूर्वीच्या वाहनांना आता कमी मायलेज मिळत आहे. या वाहन मालकांनी इथेनॉल मिश्रित पेट्रोलला विरोधा केला आहे. या प्रश्नावर १४,१२७ वाहन मालकांशी चर्चा करण्यात आली. यापैकी १२% लोकांनी E20 इंधनाचे समर्थन केले आहे. तर ४४% लोकांनी हे इंधन नको असे सांगितले आहे. २२% लोकांनी नकार देताना जर सरकारने E5, E10 किंवा E20 यापैकी इंधन निवडण्याचे पर्याय दिले तर त्यास तयार असल्याचे म्हटले आहे. परंतू हे पूर्णपणे अशक्य आहे. २२% लोकांना याबाबत काहीच कल्पना नाहीय. 

मायलेज किती घटले...आणखी एका सर्व्हेमध्ये २२,२८२ लोकांचे मत घेण्यात आले. या सर्वेक्षणात २०२२ किंवा त्याहून अधिक जुन्या वाहन मालकांचा समावेश होता. यापैकी ११ टक्के लोकांनुसार वाहनाच्या मायलेजमध्ये सुमारे २०% घट झाली आहे. तर २२ टक्के लोकांनुसार ही घट सुमारे १५-२०% च्या दरम्यान आहे. ११ टक्के लोकांनुसार मायलेज १०-१५% ने कमी झाले आहे, तर १४ टक्के लोकांनुसार मायलेज ५-१०% ने कमी झाले आहे. ११ टक्के लोकांनी सांगितले की E20 इंधनामुळे कोणताही परिणाम झाला नसल्याचे म्हटले आहे. 

 

टॅग्स :Petrolपेट्रोलPetrol Pumpपेट्रोल पंप