शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

टायर पंक्चर झाल्यावरही ‘नो टेन्शन’; केवळ ३-५ मिनिटांत हवा भरली जाईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2022 07:59 IST

प्रवासावेळी टायरमध्ये हवा कमी होणे, ट्यूबलेस टायरमध्ये पंक्चर इत्यादी बाबतीत ही मशीन खूपच उपयुक्त ठरते.

 कारमधून कुटुंबासह लांबच्या प्रवासाला जाताना, लहान-मोठ्या समस्या दूर ठेवण्यासाठी काही आवश्यक गोष्टी जवळ असणे फायद्याचे ठरते. या वस्तूंमध्ये टूल किट, आपत्कालीन वैद्यकीय बॉक्स आणि टायर इन्फ्लेटर यांचा समावेश आहे. यातील टायर इन्फ्लेटर ही छोटी मशीन टायर पंक्चरसारख्या त्रासापासून वाचवते.

टायर इन्फ्लेटर म्हणजे काय?टायरमध्ये हवा भरणाऱ्या मशीनला टायर इन्फ्लेटर म्हणतात. याचा आकार खूप लहान असतो. वाहनातील जागा वाचवण्यासाठी तुम्ही पोर्टेबल टायर इन्फ्लेटरदेखील घेऊ  शकता.

कारमधूनच मिळते पॉवर, किंमत किती?प्रवासावेळी टायरमध्ये हवा कमी होणे, ट्यूबलेस टायरमध्ये पंक्चर इत्यादी बाबतीत ही मशीन खूपच उपयुक्त ठरते. अशा परिस्थितीत टायरमध्ये हवा भरून तुम्ही बराच लांबपर्यंत प्रवास करू शकता, तसेच जवळच्या पंक्चरच्या दुकानापर्यंतही बिनदिक्कत जाऊ शकता. बाजारात अनेक टायर इन्फ्लेटर मिळतात जे कारच्या सिगारेट सॉकेटमध्ये कनेक्ट होतात. टायर इन्फ्लेटरसाठी १२ वॅट पॉवरची आवश्यकता असते, जी सिगारेट सॉकेटमधून पुरवली जाते. याच्यासोबत मोठी वायरही मिळते, त्यामुळे कारमधील सॉकेटला जोडून सहजपणे टायरमध्ये हवा भरता येते. हवा भरण्यासाठी तीन ते पाच मिनिटे लागतात.  किंमत सुमारे १ हजार रुपयांपासून सुरू होते. काही इन्फ्लेटरना एलईडी बल्ब, डिस्प्लेचाही पर्याय मिळतो. त्यामुळे अंधारातही हवा भरणे सोपे जाते.