टाटा, महिंद्रा, ह्युंदाई टोयोटानंतर आता एका कंपनीने आपल्या कारच्या किंमतीत जीएसटी कपात केली आहे. या कंपनीकडे भारतात विकण्यासाठी एकच कार आहे. त्यावर देखील एक लाख रुपयांची जीएसटी कपात करण्यात आली आहे. निस्सान ही कंपनी असून मॅग्नाईट असे काय कारचे नाव आहे.
भारतात पहिल्यांदाच कोणत्यातरी पेट्रोल कारवर १० वर्षांपर्यंतची वॉरंटी मिळते, ती ही निस्सानची मॅग्नाईट कार आहे. आधीच या मोठ्या वाटणाऱ्या कारची किंमत सहा-साडे सहा लाखांपासून सुरु होत होती. आता ती आणखी लाखभराने कमी झाली आहे. जीएसटी कपात झाल्याने निस्सान मॅग्नाईट ही साडे पाच लाखांच्या आसपास एक्स शोरुम मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे ही फाईव्ह स्टार रेटिंग मिळविलेली कार आहे.
निस्सानच्या बेसिक व्हेरिअंटची किंमत आता ६.१४ लाखांवरून 561,600 रुपये एवढी झाली आहे. या किंमतीत अल्टो ऑन रोड येत होती. तसेच मॅग्नाईट इझी शिफ्टची किंमत ६.७४ हजारांवरून ६.१६ लाख झाली आहे. तसेच निसान मॅग्नाइट सीवीटी टेक्नॉलॉजी आणि सीवीटी टेक्नॉलॉजी+ ची किंमत 97,300 रुपये आणि 1,00,400 रुपये एवढी कमी झाली आहे.