भारतीय बाजारपेठेत आपली पकड मजबूत करण्यासाठी निसानने आज त्यांच्या नवीन ७-सीटर कॉम्पॅक्ट एमपीव्ही 'निसान ग्रॅव्हाईट' लाँच करण्याची तयारी सुरु केली आहे. ही कार मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक स्वस्त आणि स्टायलिश पर्याय ठरेल. निसानने या कारला मॅग्नाईटप्रमाणेच मस्कुलर आणि प्रीमियम डिझाइन दिले आहे.
ग्रॅव्हाईटमध्ये निसानची सिग्नेचर 'V-Motion' फ्रंट ग्रिल, नवीन एलईडी हेडलॅम्प्स आणि बोल्ड बंपर देण्यात आला आहे. याचे १५-इंच अलॉय व्हील्स कारला अधिक आकर्षक बनवतात. कारमध्ये ७ जणांच्या बसण्याची सोय असून, मागची तिसरी रांग गरजेनुसार काढता येते. यामध्ये ८-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ७-इंच डिजिटल क्लस्टर आणि वायरलेस चार्जिंगची सोय आहे. सुरक्षेसाठी ६ एअरबॅग्ज, ३६०-डिग्री कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल आणि हिल स्टार्ट असिस्ट यांसारखे ५५ हून अधिक फीचर्स मिळण्याची शक्यता आहे.
इंजिन आणि मायलेज निसान ग्रॅव्हाईटमध्ये १.० लिटर, ३-सिलेंडर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन असेल, जे ७१ बीएचपी पॉवर आणि ९६ एनएम टॉर्क जनरेट करेल. यामध्ये ५-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्सचा पर्याय मिळेल. ही कार साधारण १८ ते २० किमी/लिटर मायलेज देईल अशी अपेक्षा आहे.
ही कार मार्च २०२६ पर्यंत शोरूममध्ये उपलब्ध होईल. याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ६ लाख ते ९ लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारपेठेत याची थेट स्पर्धा मारुती एर्टिगा आणि रेनॉ ट्रायबरशी असेल. या वर्षात तीन नवीन कार लाँच करणार असल्याचे निस्सानने स्पष्ट केले आहे. यामध्ये डस्टरच्या धर्तीवर आणल्या जाणाऱ्या कारचे नावही जाहीर करण्यात आले आहे. टेकटॉन ही एसयुव्ही फेब्रुवारीमध्ये शोकेस केली जाणार आहे.
Web Summary : Nissan plans to launch the Gravite, a 7-seater compact MPV, priced affordably. It features a muscular design, 8-inch touchscreen, and safety features like six airbags. Expected mileage is 18-20 kmpl. Launch by March 2026.
Web Summary : निसान ग्रेवाईट, एक 7-सीटर कॉम्पैक्ट एमपीवी लॉन्च करने की योजना बना रही है, जिसकी कीमत किफ़ायती होगी। इसमें मस्कुलर डिज़ाइन, 8 इंच का टचस्क्रीन और छह एयरबैग जैसी सुरक्षा सुविधाएँ हैं। अनुमानित माइलेज 18-20 किमी/लीटर है। मार्च 2026 तक लॉन्च।