शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

५.६५ लाखांत ७-सीटर कारचा धमाका; देशभरात सुरू झाली डिलिव्हरी; १९.६ किमी मायलेज! ढासू आहेत फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 12:29 IST

चार मीटरपेक्षा कमी लांबीची ही कॉम्पॅक्ट एमपीव्ही रेनॉल्ट ट्राइबरवर आधारित असली, तरी खास कौटुंबिक वापरासाठी तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या कारमध्ये कमी किमतीत जबरदस्त आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत.  ​​​​​​​

भारतीय वाहन बाजारात कमी बजेटमध्ये मोठ्या कुटुंबासाठी कार शोधणाऱ्या ग्राहकांसाठी निसानने एक नवी ७ सीटर कार बाजारात आणली आहे. या कारचं नाव आहे 'Gravite'. आता देशभर या कारची डिलिव्हरीही सुरू झाली आहे. ५.६५ लाख रुपये (एक्स-शोरूम) इतक्या किफायतशीर सुरुवातीच्या किमतीत ही कार उपलब्ध करून देण्यात आली आहे. चार मीटरपेक्षा कमी लांबीची ही कॉम्पॅक्ट एमपीव्ही रेनॉल्ट ट्राइबरवर आधारित असली, तरी खास कौटुंबिक वापरासाठी तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या कारमध्ये कमी किमतीत जबरदस्त आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. आकर्षक डिझाइन - निसान Gravite चे डिझाइन अत्यंत अट्रॅक्टिव्ह आणि कणखर आहे. कारच्या दर्शनी भागात निसानची सिग्नेचर 'व्ही-मोशन' ग्रिल, स्लिम हेडलाईट्स आणि डे-टाइम रनिंग लाईट्स देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे कारला आधुनिक लूक मिळतो. बोनटवर 'Gravite' असे नाव ठळकपणे लिहिलेले असून, बंपरमधील सिल्वर फिनिश आणि स्किड प्लेट तिला स्पोर्टी लूक देतात. यामध्ये १५-इंच अलॉय व्हील्स, रूफ रेल्स आणि मागील बाजूस क्रोम पट्टीने जोडलेल्या शार्प टेललाईट्स देण्यात आल्या आहेत. ही कार फॉरेस्ट ग्रीन, ओनिक्स ब्लॅक, ब्लेड सिल्वर, मेटॅलिक ग्रे आणि स्टॉर्म व्हाईट अशा पाच रंगांत उपलब्ध आहे.

प्रीमियम केबिन अन् ढासू फीचर्स -कारचे केबिन काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या थीममध्ये असून ते अतिशय प्रीमियम वाटते. सात प्रवाशांच्या आसनक्षमतेसह यात दर्जेदार मटेरियलचा वापर करण्यात आला आहे. सुरक्षेसाठी आणि सुविधेसाठी ७-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ८-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम आणि उत्तम मोबाईल कनेक्टिव्हिटी यांसारखे फीचर्स यात मिळतात.

इंजिन क्षमता आणि मायलेज:या कारमध्ये १.० लीटर, ३-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे, जे ७१ हॉर्सपावर आणि ९६ एनएम टॉर्क जनरेट करते. ५-स्पीड मॅन्युअल (१९.३ किमी/लीटर) आणि एएमटी (१९.६ किमी/लीटर) अशा दोन्ही पर्यायांत ही कार उपलब्ध आहे. भविष्यात कंपनी याचे सीएनजी व्हर्जनही लाँच करणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Nissan Gravite: Affordable 7-seater car launched in India, delivery starts.

Web Summary : Nissan launches Gravite, a budget-friendly 7-seater car, priced at ₹5.65 lakh. The compact MPV offers attractive design, premium features, and good mileage (up to 19.6 kmpl). Deliveries have commenced nationwide.
टॅग्स :Nissanनिस्सानAutomobileवाहन