शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
2
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
3
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
4
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
5
हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
6
LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
7
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
8
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
9
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
10
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
11
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
12
पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव
13
नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत   
14
“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार
15
गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...
16
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
17
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
18
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
19
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...

नवी Yamaha R15 बाईक, Aerox मॅक्सी स्कूटर भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 13:07 IST

New Yamaha R15, Aerox Maxi scooter: यामहाने अखेर भारतात नवीन R15 मोटरसायकल लाँच केली आहे. हे या जपानी ब्रँडचे एन्ट्री लेव्हल स्पोर्ट बाईकचे चौथे अपग्रेड आहे. आणखी दोन व्हेरिअंट स्टँडर्ड आणि हाय स्पेक एम मध्ये उपलब्ध आहेत. 

Yamaha 2021 R15 Range Launched: यामहाने अखेर भारतात नवीन R15 मोटरसायकल लाँच केली आहे. हे या जपानी ब्रँडचे एन्ट्री लेव्हल स्पोर्ट बाईकचे चौथे अपग्रेड आहे. आणखी दोन व्हेरिअंट स्टँडर्ड आणि हाय स्पेक एम मध्ये उपलब्ध आहेत. (Yamaha 2021 R15,  Aerox Maxi scooter Launched)

2021 Yamaha R15 ची किंमत 1,67,800 रुपये एक्स शोरुम ठेवण्यात आली आहे. तर R15M ची किंमत 1,77,800 रुपये ठेवण्यात आली आहे. R15 बरोबरच कंपनीने भारतात Aerox स्कूटर देखील लाँच केली आहे. ही स्कूटर R15 वरच आधारित आहे. या मॅक्सी स्कूटरची किंमत 1,29,000 रुपये एक्स शोरुम ठेवण्यात आली आहे. नवीन  Yamaha R15 जुन्या मॉडेपेक्षा खूप वेगळी दिसते. यामध्ये एलईडी पायलट लँपसोबत सिंगल एलईडी हेडलँप युनिटसाठी ट्विट एलईडी सेटअप हटविण्यात आला आहे. ही बाईक Yamaha R7 सारखी दिसते. आक्रमक फेअरिंग, मस्क्युलर फ्युअल टँक आणि लांब विंडस्क्रीन मिळते. 

\नव्या R15 मध्ये जुनेच 155cc लिक्विड-कूल्ड, सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. 15 एनएमसह 19 बीएचपी ताकद देते. या इंजिनला स्लिप आणि असिस्ट क्लचसोबत 6 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. R15M मध्ये चांगल्या प्रदर्शनासाठी क्विक शिफ्टरदेखील मिळतो. 2021 Yamaha R15 मध्ये मोनो शॉकसह इनवर्टेड फोर्क्सचाही वापर करण्यात आला आहे. ब्रेकिंगसाठी डिस्क ब्रेक आणि ड्युअल चॅनल एबीएस देण्यात आला आहे. 

New Yamaha AeroxYamaha Aerox 155 ही R15 वर आधारित आहे. यामध्ये देखील सारखेच इंजिन देण्यात आले आहे. मात्र, ताकद थोडी कमी करण्यात आली आहे. हे इंजिन 14 Nm आणि 15 bhp ताकद प्रदान करते. स्कूटरमध्ये ट्विन रिअर शॉक ऑब्झर्व्हर आणि स्विंगआर्मसोबत टेलिस्कोपिक फोर्क्स देण्य़ात आले आहेत. ब्रेकिंग ड्युटी एबीएससोबत पुढे आणि मागे डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.  

टॅग्स :yamahaयामहा