ब्रिटीश मोटारसायकल उत्पादक कंपनी ट्रायम्फने भारतीय बाजारपेठेत मोठा धमाका केला आहे. जीएसटी नियमांमधील बदलांमुळे ३५० सीसी पेक्षा जास्त इंजिन असलेल्या गाड्या महाग झाल्या होत्या. यावर उपाय म्हणून ट्रायम्फने आपल्या लोकप्रिय ४०० सीरीजच्या इंजिनची क्षमता कमी करून ३५० सीसी केली आहे. यामुळे या बाइक्स आता कमी टॅक्स स्लॅबमध्ये आल्या असून त्यांच्या किमतीत मोठी घट झाली आहे.
सरकारच्या नवीन नियमांनुसार, ३५० सीसी पेक्षा जास्त इंजिन क्षमतेच्या दुचाकींवर ४०% टॅक्स लागतो, तर ३५० सीसी पेक्षा कमी इंजिन असलेल्या गाड्यांवर केवळ १८% जीएसटी लागू होतो. यामुळे ट्रायम्फने आपले ४०० सीसी इंजिन ३५० सीसी पर्यंत 'डाऊनसाईज' केले आहे. यामुळे कंपनीला किमती लक्षणीयरित्या कमी करण्यात यश आले आहे.
इंजिनमध्ये काय बदल?Speed T4 या मोटरसायकलच्या इंजिनचे 'बोर आणि स्ट्रोक' कमी करून त्याची क्षमता ३५० सीसी करण्यात आली आहे. जरी इंजिन लहान झाले असले, तरी कंपनीचा दावा आहे की बाईकच्या परफॉर्मन्समध्ये फारसा फरक जाणवणार नाही. Speed T4: हे मॉडेल २९ एचपी पॉवर आणि ३१ एनएम टॉर्क जनरेट करते.नवीन Speed 400 आणि Scrambler 400X मध्ये आता सुमारे ३६.५० बीएचपी पॉवर मिळणार आहे. नवीन ३५० सीसी रेंजमध्ये ३४९ सीसी सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कोल्ड इंजिन देण्यात आले आहे.
इतर मॉडेल्स: Speed 400, Scrambler आणि Thruxton मॉडेल्समध्ये हे इंजिन ३७ एचपी पॉवर आणि ३२ एनएम टॉर्क देते.
नवीन 'Tracker 400': कंपनीने भारतीय बाजारात नवीन 'ट्रॅकर ४००' देखील लाँच केली असून, ती ४० एचपीची सर्वाधिक पॉवर देते.
रॉयल एनफील्डला थेट टक्करकमी किमतीत प्रिमियम फीचर्स आणि ब्रँड व्हॅल्यू मिळत असल्यामुळे ट्रायम्फच्या या नवीन रेंजचा थेट फटका रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० आणि होंडा सीबी ३५० च्या विक्रीला बसण्याची शक्यता आहे.
किमती किती कमी झाल्या? (दिल्ली एक्स-शोरूम)
जीएसटी दरात सवलत मिळाल्यामुळे ट्रायम्फने आपल्या गाड्यांच्या किमती ७,००० ते ११,००० रुपयांपर्यंत कमी केल्या आहेत.
| मॉडेल | जुनी किंमत (लाख) | नवीन किंमत (लाख) |
| Speed T4 | १.९५ (350cc) | |
| Speed 400 | २.३९ | २.३२ |
| Scrambler 400 | २.७० | २.५९ |
| Tracker 400 | - | २.४६ (नवीन) |
| Thruxton 400 | २.७६ | २.६६ |
| Scrambler 400 XC | २.९७ | २.९० |
Web Summary : Triumph India launched 350cc motorcycles, downsized from 400cc to leverage lower GST rates. Price cuts range from ₹7,000 to ₹11,000. New models like Speed T4 and Tracker 400 introduced, directly competing with Royal Enfield and Honda CB350.
Web Summary : ट्रायम्फ इंडिया ने कम जीएसटी दरों का लाभ उठाने के लिए 400cc से डाउनसाइज करके 350cc मोटरसाइकिलें लॉन्च कीं। कीमतों में ₹7,000 से ₹11,000 तक की कटौती। स्पीड टी4 और ट्रैकर 400 जैसे नए मॉडल पेश किए, जो रॉयल एनफील्ड और होंडा सीबी350 के साथ सीधे प्रतिस्पर्धा कर रहे हैं।