शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

New Rule of BS6: नवा नियम, टाटा अल्ट्रूझसह या १७ लोकप्रिय कार बंद होणार? काय आहे कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 12:13 IST

मीडिया रिपोर्टनुसार बीएस ६ मानकांमध्ये एक नवा नियम येत आहे. मानकांचा दुसरा टप्पा येत्या एप्रिलपासून लागू होणार आहे.

नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर आपण उभे आहोत. काही दिवसांतच हे वर्ष संपणार आहे. नव्या वर्षाबरोबर नवे नियम लागू होतील. कोरोनाच्या गेल्या तीन वर्षांत हे वर्ष ऑटो कंपन्यांसाठी खूप चांगले गेले आहे. परंतू, एक नवा नियम येत्या वर्षात ऑटो कंपन्यांची डोकेदुखी वाढविणार आहे. एक दोन नाही तर बाजारातून १७ कार बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार बीएस ६ मानकांमध्ये एक नवा नियम येत आहे. मानकांचा दुसरा टप्पा येत्या एप्रिलपासून लागू होणार आहे. रियल ड्राइविंग इमिशन (RDE) या नियमानुसार ज्या गाड्या चालविताना जास्त वायूंचे उत्सर्जन करतात त्या डिसकंटीन्यू होणार आहेत. यामध्ये अधिकतर डिझेल कार आहेत. बीएस६ मानकांची अंमलबजावणी २०२० मध्ये करण्यात आली होती. त्याचा दुसरा टप्पा आता सुरु होत आहे. आरडीई पहिल्यांदा युरोपमध्ये लागू करण्यात आला होता. नव्या नियमांनुसार वाहन निर्माता कंपन्यांना वास्तविक परिस्थितींमध्ये उत्सर्जन मानकांना पूर्ण करावे लागणार आहे. यामुळे एप्रिलपासून ऑटो सेक्टरवर याचा गंभीर परिणाम दिसून येणार आहे. 

रिअल-टाइम ड्रायव्हिंग उत्सर्जन स्तरांवर लक्ष ठेवण्यासाठी RDE ला ऑनबोर्ड सेल्फ-डायग्नोस्टिक डिव्हाइसेस देणे आवश्यक आहे. उत्सर्जनावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी आणि उत्सर्जन मानदंडांची पूर्तता करण्यासाठी हे उपकरण उत्प्रेरक कनवर्टर आणि ऑक्सिजन सेन्सर सारख्या प्रमुख भागांचे सतत निरीक्षण करेल. वाहनांमध्ये वापरल्या जाणार्‍या सेमीकंडक्टरचे थ्रॉटल, क्रँकशाफ्टची स्थिती, हवेचा दाब, इंजिनचे तापमान आणि उत्सर्जन (पार्टिक्युलेट मॅटर, नायट्रोजन ऑक्साईड, CO2, सल्फर) इत्यादींचे निरीक्षण केले जाते. तसेच प्रोग्रॅम्ड फ्युएल इंजेक्टरचाही वाहनांमध्ये समावेश करावा लागणार आहे. या साऱ्या उपद्व्यापामुळे कारच्या किंमती तर वाढतीलच शिवाय कंपन्यांसाठी देखील ही डोकेदुखी ठरणार आहे. यामुळे कंपन्या अशा गाड्यांची विक्रीच बंद करण्याची शक्यता आहे.

या कार आहेत यादीत...

  • टाटा अल्ट्रोझ डिझेल
  • महिंद्रा मराझो
  • महिंद्रा अल्टुरास G4
  • महिंद्रा KUV100
  • स्कोडा ऑक्टाव्हिया
  • स्कोडा सुपर्ब
  • रेनॉल्ट KWID 800
  • निसान किक्स
  • मारुती सुझुकी अल्टो 800
  • टोयोटा इनोव्हा क्रिस्टा पेट्रोल
  • hyundai i20 डिझेल
  • ह्युंदाई व्हर्ना डिझेल
  • होंडा सिटी डिझेल
  • होंडा अमेझ डिझेल
  • होंडा जॅझ
  • होंडा WR-V
टॅग्स :Tataटाटा