शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धुरळा उडवत निघून गेलेली डस्टर परत आली! शहरात ८० टक्के रनिंग ईव्ही मोडवर, वाचवा किती वाचवायचे तेवढे पेट्रोल... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 20:51 IST

New Renault Duster 2026 Launched in India: Renault Duster 2026 अखेर भारतात सादर! १० लाख रुपयांपासून किंमत सुरू होण्याची शक्यता. हायब्रीड इंजिन, ADAS आणि प्री-बुकिंगबद्दल सविस्तर माहिती. वाचा एका क्लिकवर.

भारतीय रस्त्यांवर एकेकाळी राज्य करणाऱ्या 'रेनॉ डस्टर' चे नवीन पिढीतील मॉडेल अखेर आज २६ जानेवारी २०२६ रोजी भारतातून अधिकृतपणे जगासमोर आले आहे. आधुनिक डिझाइन, हाय-टेक फीचर्स आणि शक्तिशाली इंजिन पर्यायांसह डस्टरने पुन्हा एकदा एसयूव्ही प्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे.

नवीन डस्टरची एक्स-शोरूम किंमत अंदाजे १० लाख रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे. कंपनीने २१,००० रुपयांच्या टोकन रक्कमेवर या गाडीचे प्री-बुकिंग सुरू केले असून, किमतींची अधिकृत घोषणा मार्च २०२६ मध्ये केली जाणार आहे. डस्टरचे पार्ट ९० टक्के हे भारतात बनविण्यात आलेले आहेत. यामुळे किंमत आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न कंपनीचा आहे. धक्कादायक बाब म्हणजे नवीन डस्टरमध्ये ७०० लिटर बूट स्पेस आहे. 

काय आहेत नवीन वैशिष्ट्ये?

इंजिन क्षमता: नवीन डस्टरमध्ये १६३ PS पॉवर देणारे 'TCe 160' टर्बो पेट्रोल इंजिन आणि १.८ लीटरचे स्ट्रॉन्ग हायब्रीड इंजिन देण्यात आले आहे. शहरात हायब्रिड कार ८० टक्के ईव्ही मोडमध्ये म्हणजेच इलेक्ट्रिक मोडमध्ये चालेल, असा दावा कंपनीने केला आहे. यासाठी १.४ किलोवॅटची बॅटरी देण्यात आली आहे. 

इंटिरिअर: यात १०.१ इंचाची टचस्क्रीन, ७ इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, व्हेंटिलेटेड सीट्स आणि इन-बिल्ट गुगल असिस्टंट सारखी सुविधा आहे.

सुरक्षा: सुरक्षेसाठी यात ६ एअरबॅग्स, ३६०-डिग्री कॅमेरा आणि लेव्हल-२ ADAS (तंत्रज्ञान दिले आहे.

खास आकर्षण: रेनॉने या गाडीसोबत ७ वर्षांची वॉरंटी जाहीर करून ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.

इंजिनचे तीन पर्याय...

१.०-लीटर टर्बो पेट्रोल (TSI): हे इंजिन बजेट ग्राहकांसाठी असेल, जे चांगली पॉवर आणि उत्तम मायलेज देईल.

१.२-लीटर टर्बो पेट्रोल (४८V माईल्ड हायब्रीड): हे इंजिन १३० bhp पॉवर जनरेट करते. यात ४८-व्होल्टची माईल्ड हायब्रीड सिस्टीम दिली आहे, ज्यामुळे गाडीचे मायलेज वाढण्यास मदत होईल.

१.६-लीटर स्ट्रॉन्ग हायब्रीड: सर्वात मोठे आकर्षण म्हणजे डस्टरचे स्ट्रॉन्ग हायब्रीड इंजिन. यात दोन इलेक्ट्रिक मोटर्स आणि १.२ kWh ची बॅटरी देण्यात आली आहे. हे इंजिन शहरातील ८०% ड्रायव्हिंग केवळ इलेक्ट्रिक मोडवर करू शकते, ज्यामुळे इंधनाची मोठी बचत होईल.

डिलिव्हरी कधी मिळणार? टर्बो पेट्रोल व्हेरिएंट्सची डिलिव्हरी मार्च २०२६ च्या मध्यापासून सुरू होईल, तर हायब्रीड व्हेरिएंट्ससाठी ग्राहकांना दिवाळी २०२६ पर्यंत वाट पाहावी लागेल. या गाडीची थेट स्पर्धा ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टोस आणि टाटा सिएरा यांसारख्या गाड्यांशी असणार आहे.

  

English
हिंदी सारांश
Web Title : Renault Duster Returns! EV Mode Focus, India Launch 2026.

Web Summary : Renault Duster's new generation model launched in India on January 26, 2026. It features a powerful engine, high-tech features, and a starting price of approximately ₹10 lakhs. Pre-booking is open. The hybrid variant offers 80% EV mode in the city. Deliveries begin mid-March 2026.
टॅग्स :Renaultरेनॉल्ट